नवापूर : नवापूरलगतच्या गुजरातमधील उच्छल येथील परिसरातील पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. नॅशनल पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उच्छलमध्येही खळबळ उडाली आहे.
बर्ड फ्लूचा अहवाल भोपाळ येथून पॉझिटिव्ह आल्याने गुजरात पशुसंवर्धन विभागाने किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. तब्बल ३६ तासांनंतर गुजरात प्रशासनाने उच्छल तहसीलदार व पशुसंवर्धन विभागाच्या नेतृत्वाखाली किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
आवश्य वाचा- धुळ्यात सभापती, उपसभापती फायनल !
गुजरात राज्यस्तरावरील पथकाने पोल्ट्रीफार्मला भेट दिली. पथकातील डॉ. अमरनाथ वर्मा, उपसंचालक डॉ. उमंग मिश्रा, राज्य ई.एम.ओ. व मुख्य जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हर्षद पटेल, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय परमार यांच्यासह जिल्हा व तालुका आरोग्य पथकाने बर्ड फ्लू आणि पुढील किलिंग ऑपरेशनसाठी आरोग्यविषयक कामांबाबत टीमला मार्गदर्शन केले.
सतरा पथकाकडून ऑपरेशन राबविणे सुरू
गुजरातमधील तापी, सुरत, नवसारी, डांग जिल्ह्यातील एकूण १७ पथके असून, त्यात साधारण ९० कर्मचाऱ्यांमार्फत किलिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. तापी जिल्ह्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीतील दोन शेडमध्ये एकूण १७ हजार कुक्कुट पक्षी, तर कोंबड्यांची ४८ हजार अंडी व २४ हजार किलो खाद्य आहे. येथील किलिंग ऑपरेशन मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू केले.
कोंबड्यांमूळे धोका
पहिल्या टप्प्यात सात हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत सात हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. उर्वरित दहा हजार पक्षी आज नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुजरात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच ५ एन १ आहे. नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्रीतील बर्ड फ्लू हा एच-५, एन-८ हा विषाणू आहे. याची तीव्रता कमी आहे. गुजरातमध्ये एच ५ एन १ या विषाणूबाधित कोंबड्यांमुळे मानवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.