नवापूर : शहरासह तालुक्यात कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे घोषित झाल्यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशी कलिंगचे काम सतत सुरू आहे. सहयोग, परवेज पठाण, डायमंड, आमलीवाला व वासिम पोल्ट्री या पाच पोल्ट्री फार्म मधील कलिंग करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पथक कोंड्यांना मारण्याचे काम करीत आहे. कलिंग करणाऱ्या पथकाचे नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
आवश्य वाचा- महिलांवर कुंटूब नियोजनाची शस्ञक्रिया केल्या; दुसऱ्या दिवशी सुरू झाला त्रास आणि डाॅक्टरसह कर्मचारी गैरहजर
सोमवारी सकाळपासून पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, प्रांतअधिकारी वसुमना पंत, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक नासिर पठाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे हे पोल्ट्री फार्मच्या सर्व परिस्थीवर नजर ठेवून आहेत.
कलिंग सुरूच
परवेज पोल्ट्री येथे २५ हजार कोंबड्या आहेत, आमलीवाला पोल्ट्री येथे सुमारे १ लाख कोंबडी आहे. वासिम पोल्ट्री येथे अंदाजे ५० हजार कोंबड्या आहे. तर डायमंड पोल्ट्री येथे आज २३ हजार कोंबडीची कत्तल करण्यात आली आहे. पोल्टी फार्म येथे आरोग्य केंद्राचे टोल लावण्यात आले आहेत. पोल्ट्री फार्म मधील कर्मचारी यांची ही तपासणी करण्यात येत आहे. पोल्ट्री बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील २७ पोल्ट्री पैकी उर्वरित २२ पोल्ट्रीतील पक्षांचे नमुने तपासणीला पाठविण्यात येणार आहेत.
आवर्जून वाचा- चोपडा तालुक्यात ११७ एकरमध्ये होणार‘एमआयडीसी’ प्रकल्प
बाजार पेठवर परिणाम
पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येत आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान चिकन मटण विक्री व्यवसायात सन्नाटा पसरला आहे. हा व्यवसाय ठप्प झाला असून त्याच्या परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहे. बर्ड फ्लू जाहीर झाल्यापासून नवापूर शहरात तालुक्यातून येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. पोल्ट्री व्यवसाय उध्वस्त होत असताना अनेक लोक यामुळे बेरोजगार होणार असून त्यांच्या रोजगाराच्या मोठा प्रश्न उभा राहणार आहे. नवापूर शहरातील आर्थिक चलनवलन यामुळे ठप्प होणार असून याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवणार आहे.
संपादन - भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.