BJP office bearers and activists celebrate BJP's victory in Madhya Pradesh, Chhattisgarh, Rajasthan assembly elections outside the party office in Dhule on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 3 राज्यांतील विजयाचा भाजपतर्फे धुळ्यात जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल धुळ्यात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवत, ढोल-ताशांच्या ठेक्यावर नृत्य करत जल्लोष केला.

या तिन्ही राज्यांतील विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्‍वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया भाजपचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केली.()

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजने विजय प्राप्त केला. या विजयाबद्दल धुळ्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठेका धरला. या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

येत्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीतही जनता भाजपलाच विजयी करेल, असा विश्‍वास श्री. अंपळकर यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. सुभाष भामरे, श्री. अंपळकर, भाजप धुळे लोकसभाप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप धुळे विधानसभा निवडणूकप्रमुख अनुप अग्रवाल, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, ज्येष्ठ नेते लखन भतवाल.

संघटन सरचिटणीस जितू चौटिया, सरचिटणीस ओम खंडेलवाल, सरचिटणीस यशवंत येवलेकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, भीमसिंह राजपूत, गोपाळ केले, डॉ. श्रीराम भतावल, सरचिटणीस चेतन मंडोरे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, उपाध्यक्ष संजय बोरसे, उपाध्यक्ष सचिन शेवतकर, उपाध्यक्ष योगेश मुकुंदे.

उपाध्यक्ष किरण रणमळे, उपाध्यक्ष हेमंत मराठे, मंडळाध्यक्ष बबनराव चौधरी, अरुण पवार, ईश्वर पाटील, भिलेश खेडकर, बंटी धात्रक, सुबोध पाटील, चिटणीस प्रथमेश गांधी, नगरसेविका वंदना थोरात, कल्याणी अंपळकर, अमोल मासुळे, राजेश पवार, गुलशन उदासी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT