Dhule Gram Panchayat : शिंदखेडा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली असून, दहा ग्रामपंचायतींवर आमदार जयकुमार रावल यांची एकहाती सत्ता आली. दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला यश मिळाले, तर तावखेडा (प्र. बेटावद) ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीला सत्ता मिळाली.
सोमवारी (ता. ६) सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीत मांडळ, गव्हाणे-शिराळे, होळ, वाडी, वाघोदे व साळवे, तर दुसऱ्या फेरीत परसामळ-कुमरेज, कंचनपूर, कदाणे, वालखेडा व तावखेडा (प्र. बेटावद)ची मतमोजणी करण्यात आली.
तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, निवासी नायब तहसीलदार शारदा बागले, नायब तहसीलदार बन्सीलाल वाडिले, संजय राणे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, शिंदखेडा पोलिस निरीक्षक दीपक पाटील, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी, श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी बंदोबस्त ठेवला. (BJP win in 10 Gram Panchayats in sindkheda dhule news)
तालुक्यातील पथारे व अंजनविहरे ग्रामपंचायती माघारीनंतर बिनविरोध झाल्या असून, ग्रामपंचायतीवर भाजप समर्थक असून, वाडी, साळवे, कदाणे, कंचनपूर, वालखेडा, गव्हाणे-शिराळे, होळ व परसामळ-कुमरेज ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दोन ग्रामपंचायतींत यश मिळाले असून, मांडळ, वाघोदे ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून, मागील काळात दोन्हीही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. तावखेडा (प्र. बेटावद) ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडी विजयी झाली आहे.
मांडळ : सरपंच ः रमाबाई आखाडे (८२७), सदस्य ः माधवराव देवरे (२६०), गीताबाई भिल (२३२), अनिता देवरे (२६५), दीपक बागूल (३४०), अनिता देवरे (२६५), ताराबाई पिंपळे (४०२), सरला पाटील (४०४), विकास ईशी (३०५), जिभाऊ ठाकरे (२७८), कोकिळाबाई बागूल (३२५).
कंचनपूर : सरपंच ः गणेश बन्सीलाल पाटील (४७२), सदस्य ः रोहिदास मालचे (२३४), सपना मोरे (१८२), शीतल पाटील (२२३), उत्तम पाटील (२६२), सरूबाई मालचे (१९६), नथू शिरसाठ (२०३), गोडमबाई पाटील (१९१), छोटू चिंतामण पाटील (२२९), लताबाई पाटील (२४७).
वाघोदे : सरपंच ः राजबाई रवींद्र बागूल (५२९), सदस्य ः भूषण माळी (१९६), स्वाती पाटील (२२०), कमळाबाई कोळी (१९४), विठ्ठल भिल (१५१), रत्नाबाई माळी (१४१), मनीषा पाटील (१८६), अधिकार पाटील (बिनविरोध). होळ ः सरपंच ः दीपाली पाटील (११७३), सदस्य : दीपक पाटील (३२०), रत्नाबाई मंगळे (२९४), वत्सलाबाई महाले (२९६), ज्ञानेश्वर भिल (३०५), रोहिणी पाटील (२८३), ईश्वर ठाकरे (२९६), पूनम पाटील (२६२), सुनंदा पाटील (२५९), ईश्वर पाटील (३२०), शारदा पाटील (३९१), मीराबाई कोळी (३७८).
गव्हाणे-शिराळे : सरपंच ः आशाबाई भिल (८९९), सदस्य : रत्नाबाई पाटील (४२५), भटू बोरसे (३९४), सीमा पाटील (४०८), भगवान बोरसे (२७९), भारती पाटील (२५५), भगवान बोरसे (२७८), भारती पाटील (२५५).
कदाणे ः सरपंच ः रावसाहेब पाटील (५९१), सदस्य : उमाकांत पाकळे (२०१), दीपाली बैसाणे (१९८), संगीता पारधी (२०२), छत्रपाल भारती (२५९), संजय तावडे (२६३), सुनील पाटील (२५९), छोटू चव्हाण (२३५), कविता ठाकरे (२१०), भदाणे कोकिळा (२१३).
वालखेडा : सरपंच ः शैलजा पाटील (१,३६०), सदस्य ः दगडू अहिरे (२२२), भुराबाई मालचे (२३३), प्रकाश भदाणे (३६६), राधिका मोरे (३८०), प्रीती मालचे (३९९), सुरेश येळवे (३४४), यशोदाबाई साळवे (२७४), वंदना येळवे (२६२), भगवान येळवे (४२०), सचिन वानखेडे (३००), प्रमिला वानखेडे (३२३).
साळवे : सरपंच ः उषाबाई वाघ (९९६), सदस्य ः पुंडलिक कुवर (३६०), भीमराव बोरसे (३४४), निर्मला बोरसे (३०३), नवल जाधव (३९४), पूनम आखाडमल (४३३), पुष्पाबाई बोरसे (४४४), अनिता गिरासे (३५१), लाडकीबाई पिंपळे (३८१), उषाबाई भारती (३४९).
तावखेडा (प्र. बेटावद) : सरपंच ः लताबाई जाधव (६७२), सदस्य ः रवींद्र जाधव (२४२), चेतन अहिरे (२१२), आशाबाई साळुंके (२४९), सुरेखा थोरात, विमलबाई कुवर, पांडुरंग कुवर, जनाबाई साळुंखे, रंगराव जाधव व कमलाबाई साळुंखे (सर्व बिनविरोध).
वाडी : सरपंच ः सुवर्णसिंग गिरासे (५२९), सदस्य : आत्माराम नगराळे (२००), कल्पना गायकवाड (१९२), आसरबाई गिरासे (१९२), मंजुळा मोरे (१७६), चंद्रकला नरभवर (१८५), गिरासे लालितसिंह (१९९), योगिनी गिरासे (१६९).
परसामळ-कुमरेज : सरपंच ः कलाबाई नगराळे (६९०), सदस्य ः बिनविरोध- यशवंत बैसाणे, रेखा भिल, केदार गिरासे, लीलाबाई भिल, ललिता पाटील, कोमलसिंग गिरासे, अजय भिल, कविता भिल, किरण कोळी. पथारे येथे सरपंचपदासाठी मंगला प्रमोद गोसावी, सदस्यपदासाठी रीमा महारू पवार, कल्पना चंद्रकांत जाधव, नंदूसिंग दादूसिंग गिरासे, इंदूबाई सरकार पवार, जितेंद्र लकडू भिल, सोनाबाई गणेश भिल, रमेश आजबसिंह जाधव बिनविरोध झाले. अंजनविहरे सरपंचपदासाठी अर्चना प्रभाकर पाटील, सदस्यपदी भाहदू जंगा भिल, सुनीता निंबा मासुळे, योगिनी शरद पाटील, भावना सतीश पाटील, विजय भिवसन पाटील, कमलेश पदमोर, कुसुम भरत पदमोर, मनीषा सुरेश पाटील बिनविरोध झाले.
सदस्य निवडून आले असून, निवडीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी परमेश्वर धनगर, रोहिदास कोळी, एस. के. कुवर, रेणुका राजपूत, भरत अहिरराव, सचिन राजपूत, अनिता भामरे, स्वाती कोळी, गिरधर देवरे, एम. डी. सोनवणे, कपिल वाघ, प्रवीण पवार, एम. ए. धनगर यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला.
मतमोजणीसाठी ३५ कर्मचारी व १० कोतवालांची नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणी केंद्राजवळच असलेल्या स्ट्राँगरूमचे सील काढून मतमोजणी यंत्र मतदान केंद्रात आणण्यात आले. मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मतदान केंद्राबाहेर विजयी उमेदवारांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवारांचा जल्लोष करण्यात आला.
रावल यांचे वर्चस्व अबाधित
आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थक गटाने सांगितले, की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पॅनलचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले असून, भाजपचा एकछत्री अंमल शिंदखेडा तालुक्यात कायम असल्याच्या निकालानंतर स्पष्ट झाले, तर विरोधकांकडे केवळ मांडळ ग्रामपंचायतीची सत्ता गेली असून, दोन गावांमध्ये स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे.
१३ पैकी ११ ग्रामपंचायतींवर रावल समर्थक पॅनलने विजय संपादन केला असून, पथारे आणि अंजनविहिरे या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्वीच बिनविरोध आल्या होत्या. उर्वरित ११ पैकी नऊ ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. निकालानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष दीपक बागल, बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.