Educational Material esakal
उत्तर महाराष्ट्र

Educational Material: पालकांच्या खिशावर GSTमुळे बोजा! शैक्षणिक साहित्यात 20 ते 50 टक्क्यांपर्यंत किमतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Educational Material : महागाईची झळ केवळ खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही वाढल्याने पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. शैक्षणिक साहित्यावर १८ टक्के जीएसटी आकारल्यामुळे वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, नोटपॅड, कंपास आदी शैक्षणिक वस्तू २० ते ५० टक्क्यांपर्यंत महागले आहे.

सर्वसामान्य पालकांच्या खिशाला हा भार यंदाही सोसावा लागणार आहे. (Burden on parents pockets due to GST 20 to 50 percent price hike in educational materials dhule news)

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. त्यानंतर वस्तूंचे दर गगनाला भिडले. आता शैक्षणिक साहित्यावर भरमसाट ‘जीएसटी’ आकारल्यामुळे शिक्षणही महागले आहे. गेल्या वर्षी एक डझन वह्यांची किंमत २४० रुपये होती, ती यंदा ३६० रुपये झाली आहे.

वीस रुपयांची एक वही आता ३० रुपये, तर ५० रुपयांची वही ८५ रुपयांना खरेदी करावी लागत आहे. मागील वर्षी दहा पेन्सिल्स ५० रुपयांना मिळत होत्या. या वर्षी मात्र त्यात २० टक्क्यांनी वाढ झाल्याने त्या ६० रुपयांवर पोचल्या आहेत.

दहा रुपयांचा पेन १५ रुपयांचा झाला आहे. ७०० रुपयांना मिळणाऱ्या दप्तराच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली असून, त्यासाठी आता थेट ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुस्तकांच्या किमतीत वाढ

कागदाचे वाढलेले दर, नवीन अभ्यासक्रम, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागांमध्ये विभागणी, वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके आदींमुळे महाराष्ट्र शासनाच्या पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या किमतीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दहावीचा गणित भाग-१ म्हणजेच बीजगणिताच्या पाठ्यपुस्तकाची किंमत मागील वर्षी ८८ रुपये होती, ती यंदा ११३ रुपये झाली आहे. दरम्यान, अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुनी पाठ्यपुस्तके अर्ध्या किमतीमध्ये विकणाऱ्या विक्रेत्यांवर उपलब्ध असलेल्या जुन्या पुस्तकांचा साठा रद्दीमध्ये काढण्याची वेळ आली आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे पालकांच्या खिशावरचा बोजा मात्र वाढतच आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व पाठ्यपुस्तकांची किंमत नाममात्र असते.

यामुळे शिक्षणासाठी बंधनकारक असणारी सर्व पाठ्यपुस्तके खरेदी केली जातात. मात्र, खासगी प्रकाशनांकडून जी सराव व मार्गदर्शक पुस्तके छापली जातात, त्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ होते.

या किमती पालकांना परवडणाऱ्या नसतात, असे शालेय साहित्य विक्रेतेच म्हणतात. दरम्यान, इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या शुल्कातही १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT