arrested  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Candle Factory Fire : 5 बळी प्रकरणी तिघांना अटक; जैताणे- निजामपूरला कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा

Dhule Candle Factory Fire : वासखेडी (ता. साक्री) येथे स्पार्कल मेणबत्तीच्या (Dhule News) कारखान्याला लागलेल्या आगीत पाच महिलांचा बळी गेला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त झाली. (Candle Factory Fire Three people arrested in the case of 5 victims death in fire accident Dhule news)

जैताणे- निजामपूर येथील व्यापारी असोसिएशनतर्फे मृतांना सामुहिक श्रद्धांजलीसाठी बुधवारी (ता.१९) शोकसभा झाली. या घटनेमुळे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी निजामपूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अनुचित घटनेतील मृत पाच महिला सर्वसाधारण कुटुंबातील होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे जैताणे- निजामपूर व्यापारी असोसिएशनकडून आर्थिक मदतही गोळा केली जात आहे.

ही मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. या प्रकरणी भय्या सुरेश भागवत यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारखाना मालक रोहिणी जगन्नाथ कुवर (रा. वासखेडी, ता. साक्री), सुरेश शापू माने (रा. धोत्री, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), वर्कशॉप सुपरवायझर जगन्नाथ रघुनाथ कुवर व कंपनी ऑपरेटर अरविंद जाधव (रा. वासखेडी) यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

निजामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी एच. एल. गायकवाड यांनी मंगळवारी रात्री रोहिणी कुवर, जगन्नाथ कुवर, अरविंद जाधव यांना अटक केली. संशयित सुरेश माने फरारी असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्कल कॅण्डलच्या (मेणबत्ती) वासखेडी (ता. साक्री) येथील अवैध कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेत पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. शहारे आणणारी ही घटना मंगळवारी (ता.१८) दोनच्या सुमारास घडली. पाच वर्षांपासून २५ बाय २५च्या खोलीत स्पार्कल कॅण्डल बनविण्याचा भवानी सेलिब्रेशन नामक कारखाना अवैधरीत्या सुरू होता.

यात दीड वर्षापासून आशाबाई भय्या भागवत (वय ३४) व मुलगी पूनम ऊर्फ राजश्री (१६) या मायलेकींसह नैनाबाई संजय माळी (४८), संगीता प्रमोद चव्हाण (३५), निकिता सुरेश महाजन (१८), सिंधूबाई धुडकू राजपूत (वय ६२, रा. सर्व रा. जैताणे, ता. साक्री) व इतर महिला कामासाठी जात होत्या. घटनेत आशाबाई भागवत, मुलगी पूनम भागवत, नैनाबाई माळी, सिंधूबाई राजपूत, संगीता चव्हाण यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमी निकिता महाजन हिच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT