fraud esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : माहिती अधिकाराचा असाही वापर! पोलिस दलाची माहिती मागविणाराच सापडेना...

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली खरी, मात्र माहिती मागविणाऱ्याचे नाव व पत्ताच लागेना. पोस्टमन शोधून शोधून थकले. मात्र ना त्या नावाचा व्यक्ती सापडला, ना त्या पत्त्यावर तसा व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले.

अखेर पोस्टाने संबंधित माहितीचे पत्र पोलिसांना सुपूर्द केले. माहिती मागणारा व त्याचा पत्ता खोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोट्या नावाने माहिती मागविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (case registered against an unknown person seeking information under false name nandurbar crime news)

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी नागरिकांना माहिती अधिकाराची व्यावहार्य शासनपद्धत आखून दिली आहे.

त्याचा वापर करून माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद असलेली माहिती वगळता नागरिक विविध शासकीय / सार्वजनिक प्राधिकरणांमधील माहिती अर्जाद्वारे प्राप्त करू शकतात. त्यासाठी केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ अमलात आला आहे.

गेल्या ६ जूनला सलीम सुलेमान बागवान (रा. बागवान गल्ली, नंदुरबार) या नावाने पोलिस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमान्वये माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता. अर्जदार बागवान यांनी मागणी केलेली माहिती त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली होती.

परंतु १२ जुलैला पोस्ट विभागाकडून पोलिस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे कळविण्यात आले की, बागवान गल्ली, नंदुरबार येथे सलीम सुलेमान बागवान या नावाची कोणतीही व्यक्ती राहत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माहितच्या अधिकारात अर्जदाराने मागितलेली माहिती देणे संबंधित शासकीय विभागाला बंधनकारक असल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून बागवान यांचा शोध घेऊन त्यांना माहिती देण्यासाठी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याला आदेश देण्यात आले.

या माहिती अधिकारातील अर्जाबाबत व व्यक्तीबाबत संशय आल्याने नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहिती काढली असता सलीम बागवान नावाची कोणतीही व्यक्ती शहरातील बागवान गल्ली व परिसरात राहत नसल्याचे निदर्शनास आले.

पोस्टमननेही असा व्यक्ती त्या पत्त्यावर नसल्याचा अहवाल दिला. पोलिसांना त्रास होईल या उद्देशाने खोट्या नावाने माहिती अधिकारात काही माहितीची मागणी केली म्हणून १८ जुलैला नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात खोट्या नावाने माहिती मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलिस प्रशासनास खोटे नाव सांगून माहिती मागून पोलिस विभागाच्या वेळेचा अपव्यय करून त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे नाव, पत्ता वापरणाऱ्या अज्ञात व्क्तीचा कसोशीने शोध घेऊन त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

"जिल्हा पोलिसांतर्फे नागरिकांना कळविण्यात येते की, माहिती अधिकाराचा कोणीही गैरवापर करू नये. सार्वजनकि किंवा शासकीय प्राधिकरणामधील माहिती घेणे हा नागरिकांचा अधिकार असला तरी खोट्या नावाने अथवा खोडसाळपणाच्या उद्देशाने अनावश्यक माहिती मागून शासकीय यंत्रणेच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय करणाऱ्या, प्रशासनास त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसे आढळल्यस संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." -पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT