Dr. Hemraj Kumawat with patent certificate. Adjacent Director Dr. J.B. Patil, Deputy Director Dr. Pramod Devare.  
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: बांधकामाच्या कचऱ्यापासून बनवले सिमेंट मोर्टार; शिरपूरच्या प्राध्यापकास पेटंट मंजूर

बांधकामात वापरल्या जाणाऱ्‍या ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटच्या निर्मितीमुळे दरवर्षी १३ अब्ज टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड तयार होतो.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जुन्या इमारती पाडल्यानंतर बांधकामातील टाकाऊ मातीच्या विटा, अन्य बांधकाम कचरा यांचा वापर करून सिमेंट मोर्टार (विटांच्या थरांदरम्यान वापरण्यात येणारी पेस्ट) तयार करण्याबाबत येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील डॉ. हेमराज कुमावत व प्रा.जी.व्ही.तपकिरे यांनी सादर केलेल्या संशोधनाला मुंबई येथील पेटंट कार्यालयाने पेटंट मंजूर केले आहे. (cement mortar made from construction waste by professor of Shirpur dhule news)

२०१७ मध्ये प्राध्यापक यांनी ‘मेथडॉलॉजी टू ऑब्टेन इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन मटेरिअल ॲन्ड मेकॅनिझम टू व्हेरिफाय इट्स स्टॅबिलिटी’ या विषयावर संशोधन दाखल केले होते. तपासणी आणि सुनावणीनंतर त्याला मंजुरी देण्यात आली.

जुन्या इमारती पाडल्यानंतर त्यातून मिळणारी वाळू, वीट आणि सिमेंट काँक्रिट मटेरियल, टाकाऊ प्लास्टिक यासह पुनर्नवीनीकरण केलेल्या बांधकाम कचऱ्‍याचा वापर करून सिमेंट मोर्टार तयार करण्यात हे संशोधन मदत करते. मोर्टार (पेस्ट) पासून तयार केलेल्या विटांच्या संरचनेची ताकद ओळखण्यासाठी प्रणालीमध्ये तापमान सेन्सर आणि स्ट्रेस सेन्सर्सची असेंब्ली आहे. एकत्रीकरण नोडच्या बाहेर आरएफ युनिट वापरल्याने वायरलेस मोडमध्ये टर्मिनल नोडद्वारे पाठवलेला स्ट्रेस डेटा प्राप्त होतो. ते एका संगणकीय प्रणालीशी जोडले जाऊन वापरकर्त्याला विटांच्या संरचनेची ताकद सुनिश्चित करुन देते.

डॉ. हेमराज कुमावत, प्रा. जी.व्ही.तपकिरे यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, उद्योगपती चिंतन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.एम.पी.जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी कौतुक केले.

पर्यावरणपूरक संशोधन

बांधकामात वापरल्या जाणाऱ्‍या ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटच्या निर्मितीमुळे दरवर्षी १३ अब्ज टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हे कार्बनचे उत्सर्जन वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या एकूण जागतिक उत्सर्जनाच्या सात टक्के इतके आहे. या उत्सर्जनामुळे ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीनहाऊस इफेक्ट यासारख्या पर्यावरणीय समस्या उद्भवू शकतात.

पर्यावरणपूरक सिमेंट मोर्टार बनवण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेची तरतूद करणे हे या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट असून ते वापरण्यास किफायतशीर आहे. येथे सिमेंट मोर्टारची गुणवत्ता मजबूत करण्यासाठी, कचरा सामग्री वापरली जाते, जी देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यावेळी ते साहित्य सिमेंटमध्ये परिपूर्ण प्रमाणात जोडले जाते, तेव्हा मिश्रणाची ताकद सध्या उपलब्ध असलेल्या मिश्रणापेक्षा सुधारणा दर्शवते.

या प्रणालीचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे उत्पादन तंत्रज्ञानामध्ये बांधकाम टाकाऊ मातीच्या विटांचा वापर करून पर्यावरणीय सिमेंटिंग सामग्री तयार करणे आणि बांधकाम कचरा सिमेंट-कॉंक्रिट वापरून पुर्नविनीकरण केलेले सिमेंट आणि पर्यावरणीय सिमेंटिंग सामग्रीचे एकसमान मिश्रण तयार करणे यांचा समावेश होतो.

सिमेंट बनवण्यापासून ते संरचनेच्या निर्मितीपर्यंत संपूर्ण निरीक्षण एकाच प्रणालीमध्ये सेट केले आहे. ही यंत्रणा टाकाऊ पदार्थांच्या मदतीने पर्यावरणपूरक सिमेंट मोर्टार तयार करून सिमेंटची स्थिरता वाढविणाऱ्या प्रक्रिया किफायतशीररीत्या उपलब्ध करून ही यंत्रणा भट्टी, भट्टीच्या गाड्या, कामगारांची संख्या वापरून मिळवलेल्या कमतरतावर मात करू शकते.

४८ इंडस्ट्रिअल पेंटट

प्रा. डॉ. हेमराज कुमावत यांच्या नावे आजवर एकूण दाखल ६४ इंडस्ट्रिअल डिझाइनपैकी ४८ इंडस्ट्रिअल डिझाइन कोलकता (पश्चिम बंगाल) येथील इंडियन पेटंट ऑफिसद्वारे स्वीकृत झाल्या आहेत. तीन युटिलिटी पेटंटपैकी दोन पेटंट मुंबई येथील इंडियन पेटंट ऑफिसला यशस्वीरीत्या नोंदवण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT