Zilla Parishad member Shalini Bhadane performing Jalpuja after filling three chain dams on Bori river. The woman next door. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: साखळी बंधाऱ्यांमुळे बोरी होणार बारमाही! 4 कोटींतून बंधारे आकारास

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बोरकुंड (ता. धुळे) परिसरातील बोरी नदीवर चार कोटींतून तीन साखळी बंधारे बांधण्यात आले. तिन्ही बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या प्रयत्नातून बंधारे आकारास आले आहेत.

बंधाऱ्यांचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्या हस्ते झाले. महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरी बारमाही करणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याने समाधान व्यक्त झाले. (chain dams 4 crores to construction at borkund Dhule News)

बोरी बारमाही करण्यासाठी बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व सदस्या शालिनी भदाणे यांचे अविरत प्रयत्न आहेत. यासाठी त्यांच्याजवळ महत्त्वाकांक्षी ॲक्शन प्लॉन आहे.

ठिकठिकाणी होणाऱ्या साठवण बंधाऱ्यांमुळे बोरीचे बारमाहीचे स्वप्न साकारताना दिसत आहे. मांडळपासून ते बोरकुंड-रतनपुरा- दोंदवाड गावादरम्यान बोरी नदीवर लाखो रुपयांचे फेजर गेट-साखळी बंधारे झाल्याने बोरी बारमाही होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

रतनपुरा-बोरकुंडसह इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील उद्‍भव विहिरींच्या पाण्याची पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साखळी बंधाऱ्यात वसंत राघो पाटील यांच्या शेतावर एक कोटी २५ लाखांचा साखळी बंधारा, रतनपुरा पाणीपुरवठा विहिरीजवळ दीड कोटीचा बंधारा व अशोक दिनकर भदाणे यांच्या शेताजवळ एक कोटी २५ लाखांचा बंधारा आकारास आला आहे.

दरम्यान, जलपूजनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अनिता पाटील, सरपंच सुनीता भदाणे, उपसरपंच सविता माळी, माजी सरपंच मंगलाबाई माळी, कमलबाई माळी, ग्रामपंचायत सदस्या आशाबाई भदाणे, रूपाली भदाणे, बेबाबाई देवरे, सविता पाटील, मंगलाबाई माळी, रेखाबाई भदाणे, माधुरी अहिरे, ममता भदाणे, पारीख, प्रमिलाबाई भदाणे, मंगलाबाई भदाणे, कमलबाई भदाणे, अलकाबाई भदाणे आदी उपस्थित होत्या.

"जिल्हा नियोजन आराखड्यातून निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साखळी बंधाऱ्यांची कामे करताना निधीची बचत करण्यात आली. बचतीतून बोरकुंड पाणीपुरवठा विहिरीजवळही एक छोटा भूमिगत बंधारा बांधण्यात आला."

-शालिनी भदाणे, जिल्हा परिषद सदस्या, बोरकुंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT