State President Bawankule while visiting house to house in the city on Thursday under BJP's Ghar Sampark Abhiyan, esakal
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : भाजपला साथ म्हणजेच भारताला आत्मनिर्भर करणे : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणत होते, की भाजप (कमळ)ला साथ म्हणजे भारताला आत्मनिर्भर करणे, भारतातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहील त्यासाठी प्रयत्न करणे असा होईल.(Chandrashekhar Bawankule statement of Supporting BJP means making India self reliant nandurbar news)

आता वाजपेयी यांचे स्वप्न लवकरच साकार होणार असून, त्यासाठी आपण प्रत्येकाने भाजपला साथ द्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम व आत्मनिर्भर भारत निर्माण करू शकतील, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपतर्फे घर चलो अभियानास नंदुरबार येथून सुरवात करण्यात आली.

त्या वेळी श्री. बावनकुळे बोलत होते. या वेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

योजनांच्या माहितीसाठी घर चलो..!

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ४५ खासदार तसेच मोठ्या संख्येने आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी घर चलो संपर्क अभियानाला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी २०२४ ला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. मोठ्या संख्येने अयोध्येला यावे.

पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांत विविध योजना राबविलेल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकासअंतर्गत पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅनची स्थापना, २०२४ पासून वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये ५० टक्के वाढ, तसेच ‘नारी तू नारायणी ः महिला सक्षमीकरण’ योजनेंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ९.६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले.

या योजना संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांनी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत. या योजनांची माहिती देण्यासाठी घर चलो संपर्क अभियान सुरुरू करण्यात आहे.

‘घर चलो’त उत्साह

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी घर चलो संपर्क अभियानाची प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी व्यासपीठ उभारून विविध विषयांवर आधारित ‘धन्यवाद मोदीजी’ या संदेशाचे सादरीकरण करण्यात आले होते. सकाळी दहाला नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सुपर वॉरियर्स पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत अभियान रॅलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

योजना गरिबांपर्यंत पोचाव्यात ः डॉ. गावित

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की घर चलो संपर्क अभियानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. सशक्त शेतकरी, समृद्ध भारत या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत ३७.५ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT