SSC HSC Board exam  esakal
उत्तर महाराष्ट्र

Board Exam : दहावी बारावी परीक्षेत परिक्षा सुरू झाल्यावरच पेपर; निर्णयात बदल

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : दहावी व बारावी परीक्षेत पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याच्या आधीच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC )व उच्च माध्यमिक (HSC) शिक्षण मंडळाने रद्द केले आहे. (Change in decision to give question paper 10 minutes before by ssc hsc board examination nandurbar news)

त्यामुळे फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेत दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार नाही. या निर्णयामुळे पेपर सुरू झाल्यावरच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना आता देता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचा अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. पेपर फुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते.

यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेच्या आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

या निर्णयाचे विद्यार्थी ,पालक व शिक्षकांनी स्वागत केले असून परीक्षा निकोप वातावरणात देता येणार आहेत. दुसरीकडे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळेचा अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT