Rajendra bamb esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सावकार बंब बंधूंवर दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील कथित एलआयसी किंगमेकर व अवैध सावकार राजेंद्र जीवनलाल बंब व त्याचा भाऊ संजय याच्याविरुद्ध येथील आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा न्यायालयात चौदाशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. सध्या हे संशयित कारागृहात आहेत. दोषारोप पत्रामुळे त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला गेला आहे. (Charge sheet filed against loan shark Bamba brothers Dhule latest marathi news)

संशयित बंब बंधूंविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात विविध कलमांसह अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियम वर्ष २०१९ चे कलम २१, २२, २३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यात पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत बंडाळे यांनी पुराव्यानिशी जिल्हा न्यायालयात गुरुवारी (ता. २५) दोषारोपपत्र दाखल केले.

अवैध सावकारी प्रकरणी संशयित राजेंद्र बंब याच्या अटकेनंतर आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत आतापर्यंत सुमारे १८ कोटींची माया जप्त झाली आहे. त्यात सुमारे साडेअकरा कोटींची रोकड आणि सव्वासहा कोटींवर किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन कोटींवर मुदत ठेवीच्या अडीच हजार पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. सावकार बंब याने वेगवेगळ्या नावांनी काही वित्त सहकारी व अन्य संस्थांमधील लॉकरमध्ये पैसा दडवून ठेवला होता. पोलिस तपासणीत तो उजेडात आला, तसेच त्याने बनावट कंपनीही स्थापन केली होती.

त्याच्यावर एलआयसीनेही कारवाई केली आहे. आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी व्यावसायिक जयेश दुसाने याने अनेक महत्त्वाची माहिती व पुरावे दिल्याने पोलिसांनी सखोल तपास केला. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या नेतृत्वात ही राज्यातील पथदर्शी कारवाई ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT