Horses facing each other in a beauty contest. 
उत्तर महाराष्ट्र

Chetak Festival: गोल्डन रॉक्स, मॅडोना व तक्षशिला सर्वांत सुंदर अश्‍व; घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेत चुरस

सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये कोट्यवधी रुपयांचे, लख लख चंदेरी व सोनेरी रूप प्राप्त असलेले अश्व स्पर्धांसाठी सहभागी झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

Chetak Festival : सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये कोट्यवधी रुपयांचे, लख लख चंदेरी व सोनेरी रूप प्राप्त असलेले अश्व स्पर्धांसाठी सहभागी झाले होते. या घोड्यांची किंमत कोटींच्या घरात होत्या. चेतक फेस्टिव्हलमध्ये २३ ते २५ डिसेंबरपर्यंत अश्व सौंदर्य स्पर्धा झाल्या.

त्यासाठी लाखो-कोट्यवधींचे अश्व येथे पाहायला मिळाले. यात मारवाड प्रजातीच्या घोड्यांची सौंदर्य स्पर्धा अटीतटीच्या झाल्या. पंजाबचा सनी गील यांच्य ‘गोल्डन रॉक्स’ या घोड्याने व गुजरातचा अश्विन पटेल यांच्य ‘मॅडोना’ व ‘तक्षशिला’ या घोडीने भारतातील ‘सर्वांत सुंदर अश्व’ हा किताब पटकाविला. (Chetak Festival competition in Marwari breed of horses Horse beauty pageant nandurbar news)

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगिता झाल्या. त्यात काठेवाड, नुकरा व मारवाड प्रजातीच्या घोड्यांची सौंदर्य स्पर्धा झाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. पंजाबचा सनी गिल यांचा ‘गोल्डन रॉक्स’, गुजरात राज्यातील अश्विन पटेल यांची मॅडोना, तक्षशिला नावाची घोडी व द्वितीय क्रमांक नुरी (राजस्थान) तर तृतीय पद्मिनी (पंजाब) क्रमशः विजयी झाले.

स्पर्धेत उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील नामवंत व देखणे घोडे सहभागी झाले होते. घोड्यांची उंची, रंग, चाल, डोळे, शरीराचा बांधा, देवमन, कंठ, पंचकल्याण, मान, पाय, या सगळ्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात येते. परीक्षण करून विजेता घोषित करण्यात आला. एकूण ३१ घोड्यांचा स्पर्धेत सहभाग होता. विजेत्या अश्वाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सौंदर्य स्पर्धेत मैदानावर अश्व आणताना मालक

चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेमध्ये विविध स्पर्धा होणार आहेत. टेन्ट पेगिंग, पोल बेंडिंग, हॉर्स जम्पिंग, बॉल इन बकेट, ड्रेसाज, अश्व दौड रेवाल व विविध स्पर्धा होतील. स्पर्धेत जास्तीत जास्त अश्र्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले. पिंदर शेरीवाला (भटिंडा, पंजाब) विकास बोयतकर (पुणे, महाराष्ट्र), यारविंदर सिंग (मुकसर, पंजाब) जयेश पेखळे विक्रम जोजावर (राजस्थान) हर्षवर्धन तावरे बारामती, सुकवन सिंग किंग्रा (पंजाब) यांनी परीक्षण केले.

‘ॲम्ब्युलन्स’ने आले अश्व

दिल्ली, तमिळनाडू, पंजाब येथील अनेक अश्व प्रदर्शनासाठी पुण्यापर्यंत विमानाने दाखल झाले. पुण्याहून वातानुकूलित ‘ॲम्ब्युलन्स’ने येथील स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रत्येक अश्वाच्या किमती कोटीच्या घरात होत्या. यामुळे सारंगखेडा अश्व बाजारात एकाहून एक सरस अश्व पाहण्याचा योग अश्वप्रेमींना आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT