child protection campaign esakal
उत्तर महाराष्ट्र

Child Protection Campaign : राज्यभरात बालसुरक्षा जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान सुरू

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व शाळा व अंगणवाडीमधील एक लाख १५ हजारावर विद्यार्थ्यांची वैद्यकीय (Medical) आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. (Child safety conscious parents healthy child campaign launched dhule news)

हे अभियान गुरुवार (ता. ९) पासून सुरू होत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरही होईल.

राज्यभरात बालसुरक्षा जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान सुरू होत आहे. यात शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानाबाबत नियोजनासाठी बुधवारी (ता. ८) महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. एम. आर. शेख, आरसीएच ऑफिसर डॉ. संपदा कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आयुक्त टेकाळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार मोहिमेंतर्गत सर्व शाळा व अंगणवाड्यांमधील एकूण एक लाख १५ हजार १२२ विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, ज्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे,

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

अशा लाभार्थ्यांना पुढील उपचार या अभियानांतर्गत दिले जाणार आहेत. अभियानात धुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे एकूण २५ वैद्यकीय आरोग्यपथके नेमण्यात आली आहेत. धुळे शहरातील मनपांतर्गत प्रभातनगर (देवपूर), राऊळवाडी (चितोड रोड), कृष्णनगर (साक्री रोड), नंदीरोड (तिरंगा चौक), हजारखोली या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये अभियान राबविण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारीला महापालिकेंतर्गत असलेल्या प्रभातनगर, राऊळवाडी, कृष्णनगर, नंदीरोड, हजारखोली या पाचही प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा लाभ घ्यावा,

मोहिमेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शेख, डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT