Childbirth program is being implemented in district from September 1 nandurbar news sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Mission 84 Days : आरोग्य विभागाचे ‘मिशन 84 दिवस’; आजपासून बाळंतपणाचा निश्चय बालक सुरक्षेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Mission 84 Days : नंदुरबार जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील प्रमाणापेक्षा अधिक आहे. तसेच संस्थात्मक प्रसूतीदेखील कमी आहे.

त्या अनुषंगाने मृत्यू दर कमी करणे व संस्थात्मक प्रसूती वाढविण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मिशन ८४ डेज (संकल्प ८४) उपक्रम सुरक्षित आरोग्य संस्थेतर्फे बाळंतपणाचा कार्यक्रम १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. (Childbirth program is being implemented in district from September 1 nandurbar news)

संकल्प ८४ दिवसांचा सुरक्षित आरोग्य संस्थेत बाळंतपणाचा या कार्यक्रमात आशा, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी ४२ दिवस प्रस्तूतीपूर्व गरोदर मातांना व ४२ दिवस प्रसूतिपश्चात स्तनदा माता व बालकांना भेटी देऊन सेवा देणार आहेत.

याअंतर्गत प्रसूतीपूर्व ४२ दिवस भेटीत मातेचे नाव व त्याचे गाव, प्राथमिक केंद्र, वय, खेप, मागील पाळी तारीख, संभावित प्रसूतीची तारीख, प्रसूतीचे संभाव्य ठिकाण, संस्थात्मक प्रसूतीचे नियोजन केले आहे.

दर पंधरा दिवसांनी हिमोग्लोबिन रक्तदाब नोंद घेणे, सोनोग्राफी करून घेणे, सिकलसेल चाचणी करणे, माता हाय रिस्क आहे का त्याची कारणे, प्रसूतिपूर्वक भेटीची नोंद घेणे, पोटावरची तपासणी केल्याच्या नोंदी, धोक्याची लक्षणे पाहणे, बाळाची हालचाल, अंगावरून रक्तस्राव अथवा इतर स्राव होतोय का, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, जीव घाबरणे, हातापायाला सूज यापैकी मातेला काही लक्षणे आहेत का, असतील तर संदर्भसेवा देणे, माताला कोठे संदर्भ केले याचा तपशील ठेवणे या नोंदी घेतल्या जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संकल्प संस्थेत बाळंततपणाचा निश्चय बालक सुरक्षेचा या मोहिमेसाठी तळोदा तालुका आरोग्य विभाग सज्ज झाला असून, याकामी तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रनिहाय समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आशा, आशा गटप्रवर्तक यांच्या बैठका घेण्यात येऊन नियोजन करण्यात आले आहे.

प्रसूतीपश्चात ४२ दिवस अंतर्गत मातेचे नाव, गावाचे नाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, मातेचे वय, मातेची प्रसूती तारीख, बाळाचे प्रसूती वेळेस वजन, प्रसूती ठिकाण, प्रसूतीचा प्रकार, बाळाला लघवी होते का, शौच होते का, बाळ दूध ओढते का, स्तनपान दिवसातून किती वेळा केले जाते, बाळ सुस्त आहे, अतिप्रमाणात रडते का, नाळेला जखम आहे का ही लक्षणे पाहणे, स्तनदा मातेला ओटीपोटात दुखते का, जास्त प्रमाणात रक्तस्राव आहे का, नाडीचे ठोके, रक्तदाब, स्तन, गर्भाशयाला सूज, योनीमार्गातून अधिक प्रमाणात रक्तस्राव ही लक्षणे तपासणे तसेच संदर्भ सेवा व उपचार करून घेणे ही कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT