Red Chilli  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लाल मिरचीची 35 कोटींहून अधिक उलाढाल; धुळे, नंदुरबारला दर तेजीत

अत्यल्प पावसामुळे यंदा जिल्ह्यातील मिरची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर तेजीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अत्यल्प पावसामुळे यंदा जिल्ह्यातील मिरची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. मिरची उत्पादनात आघाडीवर असलेल्या शेजारील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि नंदुरबारमध्येही उलाढाल बरी आहे.

धुळे, दोंडाईचा, नंदुरबारमध्ये लाल, ओल्या मिरचीची आतापर्यंत सुमारे ३५ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. तुलनेत धुळे बाजार समितीत स्थानिक लाल मिरचीने २४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर पार केला आहे. (Chilli production in district has decreased due to low rainfall this year Therefore prices of red chillies increasing dhule news)

ओल्या, हायब्रिड, पांडी प्रजातीच्या मिरचीची आवक घटल्याने उत्पादकांना नऊशे ते १६ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी असा लाल मिरचीचा हंगाम असतो. त्यानुसार बाजारात मिरचीची आवक सुरू झाली आहे. ग्रामीण भागासह लगतच्या शहरातील शेतकरी मिरची विक्रीसाठी आणत आहेत.

मागील वर्षी गारपीट व कमी पाऊस झाल्याने मिरचीचे सरासरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक मिरचीला उच्चांकी भाव मिळत आहे. हायब्रिड मिरचीचा दर दर्जानुसार ९०० ते १९ हजार रुपये क्विंटल आहे. ओली मिरची एक हजार ते सहा हजार रुपये क्विंटल आहे.

धुळे बाजार समिती

धुळे बाजार समितीत बुधवारी (ता. ७) स्थानिक लाल मिरचीची ५५६ क्विंटल आवक झाली. कमाल २४ हजार १००, किमान एक हजार व सरासरी १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादकांना मिळाला. तसेच ओली लाल मिरचीची ९१ क्विंटल आवक झाली.

कमीत कमी एक हजार, सर्वाधिक सात हजार ५६ आणि सर्वसाधारण पाच हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. साधारण लाल मिरचीची फक्त सात क्विंटल आवक झाली. किमान १३ हजार ७२०, कमाल १४ हजार ९९४ प्रतिक्विंटल दर उत्पादकांना मिळाला.

जानेवारीअखेर आवक

जिल्ह्यात ३१ जानेवारीला ९६० क्विंटल हायब्रिड लाल मिरचीची आवक झाली. त्यामुळे कमाल १९ हजार व सरासरी १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्या तुलनेत ओल्या लाल मिरचीची २३० क्विंटल आवक झाल्याने किमान एक हजार, कमाल सात हजार ३५० व सर्वसाधारण सहा हजार ५२ रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादकांना मिळाला होता.

शुक्रवारी (ता. ९) केवळ आठ क्विंटल हायब्रिड लाल मिरचीची आवक झाली. किमान एक हजार, कमाल चार हजार ३५० व सरासरी तीन हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्या तुलनेत ओल्या लाल मिरचीची ८२ क्विंटल आवक झाल्याने किमान अडीच हजार.

कमाल सात हजार ८४० व सर्वसाधारण पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादकांना मिळाला. साधारण लाल मिरचीची पाच क्विंटल आवक झाली. यात ११ हजार किमान, १७ हजार ५०० कमाल व १२ हजार ७४० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर राहिला.

नंदुरबारला आवक नाही

नंदुरबार बाजार समितीत अखेरची आवक ३ जानेवारीला झाली होती. त्या वेळी चार हजार ९०८ क्विंटल ओली लाल मिरची समितीत विक्रीला दाखल झाली होती. किमान दोन हजार २११, कमाल चार हजार ४००, तर सर्वसाधारण तीन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

तत्पूर्वी १ जानेवारीला सात हजार २०१ क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी दीड हजार, जास्तीत जास्त चार हजार ७५० तसेच सरासरी तीन हजार १२५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला हायब्रिड लाल मिरचीची १३ क्विंटल आवक झाली.

किमान सहा हजार, कमाल सात १९५ व सर्वसाधारण सहा हजार ६०० तसेच ओल्या लाल मिरचीची सहा हजार ९१२ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी सर्वसाधारण चार हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. महिन्यापासून कोणत्याही प्रजातीच्या मिरचीची नंदुरबार बाजार समितीत आवक झालेली नाही.

दोंडाईचात आठ कोटींची उलाढाल

निमगूळ : मिरचीचे आगार असलेल्या दोंडाईचात सद्यःस्थितीत ओली मिरचीचा प्रतिक्विंटल दर सरासरी ४५०० ते ५५००, कोरड्या मिरचीचा ५००० ते १३००० रुपये दर आहे. दोंडाईचा बाजार समितीत रोज सरासरी दोनशे ते पाचशे क्विंटल मिरचीची आवक होत आहे.

आतापर्यंत सरासरी १८ हजार क्विंटल आवक झाली असून, सरासरी आठ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. दोंडाईचात चार खरेदीदार आहेत. तुलनेत नंदुरबार येथे ४० खरेदीदार असून, तेथे तीन ते चार पटीने अधिक आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT