Chitra Mahale esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नववीतील चित्रा बनली कुटुंबाचा आधारस्तंभ

वडिलांच्या निधनानंतर शाळकरी जिद्दी मुलगी ट्रॅक्टरने करते ३५ बिगे बागायत शेती.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वडिलांच्या निधनानंतर शाळकरी जिद्दी मुलगी ट्रॅक्टरने करते ३५ बिगे बागायत शेती. वडिलांच्या निधनानंतर चित्रा महाले कुटुंबाचा आधारस्तंभ बनली आहे. (Chitra in ninth grade student became pillar of family dhule news)

येथील चित्रा रावसाहेब महाले ही नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी वडिलांच्या निधनानंतर ट्रॅक्टर चालविणे शिकली. ट्रॅक्टरने नांगरणी, रोटा फिरवणे, ट्रॉलीने शेतमाल घरी आणणे, शेतात मजूर घेऊन जाणे, फवारणी करणे, पिकांना पाणी देणे इत्यादी सर्वच कामे चित्रा अतिशय पद्धतशीरपणे करत असून, समाधानकारक उत्पादनही काढत असल्याने ती तिच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ बनली आहे.

चित्रा येथील इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेत नववीत शिक्षण घेत आहे. शेतातल्या सर्व जबाबदाऱ्यांसोबत शाळेतील हुशार विद्यार्थिनी म्हणून अभ्यासातही पुढे आहे. शाळेतील विविध स्पर्धांत तिने अनेक पारितोषिके मिळविली आहेत. २०२० मध्ये वडिलांचे अल्प आजाराने निधन झाले. तेव्हा चित्रा सातवीत होती.

वडिलांच्या निधनानंतर मोठ्या जिद्दीने चित्रा ट्रॅक्टर चालविण्यास शिकली. आठवीत असतानापासून घरच्या ३५ बिगे बागायती शेतात कमी वयात एखाद्या कसलेल्या शेतकऱ्यासारखी ती मेहनत घेते. तिच्या जिद्दीला वयस्कर आजोबा देवीदास महाले, आजी अंबाबाई व विधवा आई रत्नाबाई यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला.

चित्राची मोठी बहीण रोहिणी धुळे येथे उच्च शिक्षण घेत आहे व लहान भाऊ भावेश पाचवीला आहे. वेळोवेळी काका मदन महाले यांचेही सहकार्य लाभते.

चित्रा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या विचारांनी प्रभावित असून, कुठल्याच क्षेत्रात महिला कमी नसल्याने तिने वयाच्या पंधराव्या वर्षीच दाखवून दिले. चित्रा तरुण पिढीसाठी एक आदर्श बनली आहे. तिला शेतात व गावात ट्रॅक्टरने विविध कामे करताना बघून ग्रामस्थ थक्क होतात, शिवाय कौतुक करत नालायक मुलापेक्षा चित्रासारखी जिद्दी मुलगी श्रेष्ठ असल्याचे बोलून दाखवितात.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीमुक्तीसाठी मोठा लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त जिद्दी चित्राने समाजाला एक नवा आदर्श दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT