Shahada: In Vijayanagar area of ​​the city, the work of asphalting has been stopped by the citizens alleging that the substandard work is being done. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नागरिकांनी थेट निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम बंद पाडले

सकाळ वृत्तसेवा

शहादा : शहरातील विजयनगर भागात पालिकेच्या नागरी सेवा व सुविधा योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा नागरिकांनी रोष व्यक्त करत थेट कामच बंद पाडले.

शहरात सध्या विविध योजनेंतर्गत पालिकेमार्फत रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यात विजयनगर भागातही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, ठेकेदारामार्फत संबंधित पूर्वीच्या रस्त्यावर थेट डांबरखडी मिश्रित डांबरीकरणाचे काम सुरू होते. यावर परिसरातील रहिवासी नागरिक एकत्र होत आम्हाला रस्ता मजबूत पाहिजे.

हा रस्ता जास्त काळ टिकणार नाही, काम निष्कृष्ट होत आहे, दर्जा चांगला पाहिजे, असे म्हणत थेट कामच बंद पाडले. या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देत ज्या प्रकारे निधी आहे तेवढ्या निधीतूनच काम होईल. (Citizens immediately stopped the substandard road Work Nandurbar News)

मजबुतीकरणासाठी अधिकचा निधी लागेल, असे म्हणत नागरिकांची समजूत काढली. या वेळी नागरिक मात्र कामाचा दर्जा चांगला पाहिजे यावर ठाम राहिले. त्यामुळे निधीची वाढीव तरतुदीनुसार रस्ता मजबुतीकरणाचे आश्वासन संबंधित नागरिकांना या वेळी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांचा रोष, अखेर काम बंद

या वेळी उपस्थित पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांतर्फे रस्त्याचा निकृष्ट कामाबाबत विचारणा करण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांमध्ये आमदारांनी निधी आणला त्या निधीतून काम होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर नागरिकांनी थेट आमदारांशी संपर्क साधला.

त्यावर त्यांनी स्वीय सहाय्यकाला घटनास्थळी पाठविले व माहिती जाणून घेतली. या वेळी मुख्याधिकारी दिनेश सिनारे, बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी पाहणीसाठी आले असता त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी निधी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तब्बल दोन तासांच्या वादविवादानंतर अखेर काम बंद करण्यात आले.

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

"विजयनगर भागात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून, पूर्वीच्या मातीमिश्रित रस्त्यावर फक्त डांबरीकरणाचा थर टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर मोठी खडी टाकून मजबुतीकरण करून नंतर डांबरीकरण करणे अपेक्षित होते; परंतु नागरिकांच्या समाधानासाठी डांबरीकरण केले जात आहे. रस्ता फार काळ टिकणारा नसून सर्वांनी मिळून काम बंद केले."

-शरद पाटील, रहिवासी

"आमच्या घरासमोर नेहमी पावसाळ्यात पाणी साचते. इतर रस्त्यांपेक्षा याची उंची कमी असल्याने पुन्हा पाणी साचेल यासाठी उंच व टिकाऊ रस्ता झाला पाहिजे. आधीच २० वर्षांनंतर रस्ता तयार होत आहे."

-मायाबेन पाटील, रहिवासी

"शासनाकडून आलेल्या निधीचा सदुपयोग करून उत्कृष्ट काम झाल्यास निश्चितच त्याचे स्वागत केले जाईल; परंतु निकृष्ट दर्जाचे काम रहिवासी सहन करणार नाहीत. आहे त्या निधीतून थातुरमातुर काम करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी वाढीव निधी मिळवावा. एक वेळा काम झाल्यास ते पुनःपुन्हा होत नाही."

-सुरेश जाधव, रहिवासी, विजयनगर, शहादा

"विजयनगर वसाहतीतील ज्या रस्त्याचे काम सुरू होते त्याचा निधी कमी आहे. खडीकरण व मजबुतीकरणासाठी नवीन वाढीव निधी मंजूर करावा लागेल. आमदार राजेश पाडवी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली जाईल. तोपर्यंत काम थांबविण्यात आले आहे."

श्री. महाजन, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT