कापडणे : मुंबई-आग्रा महामार्गावर राजस्थानमधील मातीचे पारंपरिक भांडे विक्रेते दाखल झाले आहेत. दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे भाजी बनविणारी हंडी अर्थात मडकीही आहेत.
भाजीपोळीसाठीचा मातीचा तवाही विक्रीस आहे. मातीच्या पारंपरिक भांड्यांना लगतच्या गावांमधून आणि प्रवाशांमधून मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे पुन्हा मातीच्या भांड्यांना पूर्ववत पूर्वीचे दिवस येत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Clay mutton handi and tawa are Sale on highway Dhule News)
मातीच्या भांड्यांना वाढती मागणी
सध्या महामार्गावर जीवनावश्यक गरजांच्या विविध वस्तू विक्रीचा ट्रेंड निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमधून या वस्तू विक्रीसाठी विक्रेते दाखल होत आहेत. सध्या माठ वगळता इतर मातीच्या वस्तू दाखल झाल्या आहेत.
मातीची मटण हंडी
महामार्गावरील ढाब्यांवर मटण हंडी खूपच ‘फेमस’ असते. मात्र ही ती हंडी नाही. मटणाची भाजी बनविणारे मातीचे भांडे म्हणजे हंडी होय. खास पारंपरिक चव आणि पौष्टिकता वाढविणारे हे भांडे आहे. इतरही भाजी तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे जाणकारही सांगतात. दोनशेपासून ते साडेपाचशेपर्यंत ही हंडी विक्रीस आहे. हंडीसह गार पाण्यासाठी मातीची बॉटल आणि चहासाठी कुलडही विक्रीस आहे.
"घरातील दैनंदिन वापरासाठी पुन्हा मातीच्या भांड्यांचा वापर वाढला आहे. पारंपरिक भांड्यांना महत्त्व आहे. ती वापरायला हवीत."
-मनोज सलाखे, मातीचे भांडे विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.