potter community esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कुंभार समाजाला मातीची रॉयल्टी माफ; संजय गाते यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कुंभार समाजाला मातीवरील रॉयल्टी माफी ५०० ब्रासवरून ७०० ब्रास करण्याचे, वीट व्यावसायिकांना बिगरशेती परवानगी अट (एनए) शिथिल करण्याचे व अकृषक शुल्क रद्द करण्याबाबतचे शासन परिपत्रक संपूर्ण राज्यात लागू करण्याचे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले, अशी माहिती कुंभार समाजाचे नेते तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते यांनी दिली. (Clay royalty waiver for potters community dhule news)

कुंभार समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने ५ एप्रिलला मुंबईत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस गाते उपस्थित होते. बैठकीत विविध मागण्या मांडण्यात आल्या.

यात कुंभार समाजाला विटा, कौले, मातीचे भांडे व मूर्ती तयार करण्यास लागणाऱ्या मातीवरील रॉयल्टी माफी दर वर्षी ५०० ब्रासवरून १००० ब्रासपर्यंत करावी, पारंपरिक कुंभार वीट व्यावसायिकांना बिगरशेती परवानगी अट शिथिल करावी, कुंभार समाजातील वीट व्यावसायिकांना अकृषक शुल्क रद्द करावे, तलाव व बंधाऱ्यातील गाळ (माती) कुंभार व्यवसायाकरिता निःशुल्क उपलब्ध करावा,

कुंभार व्यवसायाकरिता महापालिका, पालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील जागा अग्रक्रमाने द्यावी, अहमदनगर जिल्ह्यातील कुंभार वीट व्यावसायिकांकरिता निर्गमित ३० नोव्हेंबर २०२२ चे शासन परिपत्रक संपूर्ण राज्यात लागू करावे, तसेच माती उत्खनन व वाहतुकीचा परवाना दर वर्षी १ ऑक्टोबर ते ३० जून या कालावाधीकरिता देण्यात यावा आदी मागण्यांचा यात समावेश होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मंत्र्यांचे निर्देश

मंत्री विखे-पाटील यांनी महसूल विभागाचे सचिव, उपसचिव व अवर सचिव यांना कुंभार समाजाला मातीवरील रॉयल्टी माफी ५०० ब्रासवरून ७०० ब्रास करण्याचे, वीट व्यवसायासाठी बिगरशेती परवानगी अट शिथिल करण्याचे व अकृषक शुल्क रद्द करण्याचे ३० नोव्हेंबर २०२२ चे शासन परिपत्रक संपूर्ण राज्यात्त लागू करण्याचे निर्देश दिले.

तसेच माती उत्खनन व वाहतूक परवाना कालावधी १ ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत करण्याबाबतही स्पष्ट निर्देश दिले. कुंभार खाणींबाबत सर्व विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल मागवावा यासह इतर मागण्यांबाबत नगरविकास, ग्रामविकास व ऊर्जा मंत्रालयाला सूचित करण्याचे निर्देश दिल्याचे श्री. गाते यांनी म्हटले आहे.

राज्यातील कुंभार समाजाचे सुभाष तेटवार, संजय जोरले, चंदन प्रजापती, राजीव खरे, श्री. संतोष, अनिल चित्ते, संजय वाडकर, राजेश प्रजापती, संदीप पाटील, मनोज बनचरे, भीमराव डेरे, बाबाजी कुंभार, सतीश ढोंडे, मकरंद कुंभार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT