Commissioner Amita Dagde-Patil and other officers participating in Panzra river cleaning drive on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : ‘पांझरे’च्या एकाच पट्ट्यात वर्षानुवर्षे ‘साफसफाई’; 22 टन कचरा संकलित

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते २३ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : नागरिकांपर्यंत स्वच्छतेविषयी संदेश पोचावा व त्यातून स्वच्छतेचा गुण अंगवळणी पडावा किंवा किमान सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याच्या सवयीला लगाम लागावा या उद्देशाने यंत्रणेमार्फत स्वच्छता अभियाने राबविली जातात.

धुळे महापालिकेमार्फतही गेल्या अनेक वर्षांपासून असे अभियान, मोहिमा राबविल्या जात आहेत. पांझरा नदीपात्रात वर्षानुवर्षे एकाच पट्ट्यात ही मोहीम राबविण्याचा प्रयोग मात्र अनाकलनीय आहे. (Cleaning in same strip of panzara river for years 22 tons of garbage collected dhule municipality news)

गणपती मंदिर पूल ते लहान पूल या पट्ट्यात आजपर्यंत कितीतरी मोहिमा राबविल्या गेला. या पट्ट्यातला कचरा मात्र काही केल्या साफ होत नाही असे दिसते. रविवारी (ता. २१) पुन्हा एका मोहिमेतून महापालिकेने येथून तब्बल २२ टन कचरा काढला.

शासनाच्या आदेशानुसार धुळे महापालिकेने डीप क्लीन ड्राइव्ह राबविण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते २३ जानेवारीदरम्यान विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रस्ते, चौक, मंदिरे आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी पांझरा नदीपात्रात अर्थात गणपती मंदिर ते लहान पूल यादरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या पट्ट्यासाठी सहा झोन तयार करण्यात आले. प्रत्येक झोननुसार अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सुमारे ३५० ते ४०० सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

बावीस टन कचरा संकलित

पांझरा नदीपात्र स्वच्छता मोहिमेसाठी दोन पोकलेन, तीन जेसीबी, वॉटर जेट टँकर, तीन डंपर प्लेसर, पाच ट्रॅक्टर आदी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला. यातून सुमारे २० ते २२ टन कचरा संकलित करण्यात आला.

तसेच नदीपात्रालगतचे घाट व मंदिरांची अग्निशामक बंबाद्वारे संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनीही मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अतिरिक्त आयुक्त करून डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या नियंत्रणात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांची या मोहिमेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, प्रदीप चव्हाण, हेमंत पावटे.

कमलेश सोनवणे, कनिष्ठ अभियंता भूषण ढवळे, मयूर निकम, प्रणव शिंदे, निखिल टकले, मोहनीश पाटील, पराग ठाकरे, राकेश पवार मोहिमेसाठी कार्यरत आहेत.

स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, चंद्रकांत जाधव, संदीप मोरे, गजानन चौधरी, रूपेश पवार, प्रमोद चव्हाण, शुभम केदार, अख्तर शेख, सर्व मुकादम आदी या मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत.

त्या पट्ट्याची भुरळ कायम

केंद्र, राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत धुळे शहरात महापालिकेतर्फे अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियाने राबविली जात आहेत. तत्कालीन आयुक्त नामदेव भोसले यांनी पांझरा नदीपात्रात ही मोहीम सुरू केली.

तेथे त्यांनी चक्क जॉगिंग ट्रॅकही केला होता. पांझरा नदीपात्रातील स्वच्छतेचा हा सिलसिला आजतागायत सुरू आहे. गणपती मंदिर पूल ते छोटा पूल या पट्ट्याव्यतिरिक्त ही मोहीम पुढे का सरकत नाही हा प्रश्‍नच आहे.

जेसीबी, पोकलेन व इतर यंत्रसामग्रीतून होणारी ही साफसफाई इतरत्रही होण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT