vinod pancholi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : नवापूरला गुजराती शाळेचा लिपिक लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : शाळेतील शिक्षकाच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात ४५ हजाराची लाचे स्वीकारताना नवापूर शहरातील दी. एन. डी. ॲन्ड एम. वाय. सार्वजनिक गुजराती हायस्कूलचा वरिष्ठ लिपिक विनोद साकरलाल पंचोली (५०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

ही कारवाई बुधवारी (ता.२१) रात्री उशिरा करण्यात आली. (Clerk Vinod Pancholi was arrested for taking bribe of 45 thousand nandurbar bribe crime news)

तक्रारदाराने गुजराती हायस्कूलमधून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्याच्या शील्ल्क रजांच्या रोखीकऱणाची रक्कम मिळावी यासाठी त्याने प्रक्रिया केली होती. त्यानुसार तक्रारदाराला त्यांच्या रजा रोखीकरणाच्या रकमेचा धनादेश विनोद पंचोलीने काढून दिला. ती रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाली होती.

ही रक्कम काढून दिल्याबद्दल विनोद पंचोलीने तक्रारदाराकडून २० जूनला ४५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ठरल्याप्रमाणे २१ जूनला लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, विलास पाटील, ज्योती पाटील, देवराम गावित, अमोल मराठे, नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस निरीक्षक समाधान वाघ, विजय ठाकरे, संदीप नावडेकर, जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT