Dhule News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत १० जुलैला धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. तो प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
त्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी २७ नोडल अधिकारी आणि त्यांना मदतीसाठी सहाय्यक नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.(CM In Dhule 27 Nodal Officers appointed in Dhule Shasan Aplya Dari Campaign Chief Minister Deputy Chief Minister on tour Dhule News)
व्यवस्थापन व नियोजनासाठी नियुक्त नोडल अधिकारी व त्यांची जबाबदारी अशी ः अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यावर सर्व विभागांशी समन्वय साधणे, वेळोवेळी शासनास माहिती सादर करणे, कार्यक्रम आयोजनासंबंधी कामे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या राजशिष्टाचारविषयक कामकाज.
निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यावर शासन आपल्या दारीमार्फत विविध योजनांचे लाभार्थी, पात्र लाभार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारी, माहिती संकलन व व्यवस्थापनासह याद्या तयार करणे.
लाभार्थ्यांची यादी व कामे
जिल्हा पुर्नवसन अधिकारी सुरेखा चव्हाण, श्री. तडवी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ देण्यात येणाऱ्या सर्व विभागांच्या लाभार्थ्यांची यादी करणे व आनुषंगिक कामे. शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्यावर मंडप व्यवस्था समिती नियोजन.
भूसंपादन उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, संदीप पाटील यांच्याकडे स्टेज व्यवस्था. श्रीमती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, श्री. गावंडे यांच्याकडे पाहुण्यांचे स्वागत व्यवस्थापन.
अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था व आनुषंगिक कामे, वाहतूक नियोजन, वाहनतळ व्यवस्थापन. हिरे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांच्याकडे राजशिष्टाचारानुसार वैद्यकीय व्यवस्थापन व महाआरोग्य शिबिराचे नियोजन असेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाणी, स्वच्छतेची व्यवस्था
मनपा अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, उपायुक्त शिल्पा नाईक यांच्याकडे स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांच्याकडे लाभार्थ्यांसाठी स्टॉल उभारणी, वाटप, नियोजन व व्यवस्थापन.
सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांच्याकडे शामियाना उभारणी, बैठकव्यवस्था, राज्य कर उपायुक्त भानुदास माळी, भूमी अभिलेख अधीक्षक प्रशांत बिलोलीकर यांच्याकडे बैठकव्यवस्था व्यवस्थापन, वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता वैरागडे यांच्याकडे वीजपुरवठा, श्री. सनेर, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हाटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडे प्रचार व प्रसिद्धी असेल.
लाभार्थ्यांना फूड पॅकेट्सचे वाटप
एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, अग्निशमन अधिकाऱ्यांवर अग्निशमन व्यवस्था, तसेच श्री. शेलार, जिल्हा उद्योग अधिकारी उपेंद्र सांगळे, लघुपाटबंधारे अभियंता एन. एम. वट्टे, तापी महामंडळाचे अधीक्षक अभियंता खांडेकर, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. वाडेकर यांच्याकडे भोजन, लाभार्थ्यांसाठी फूड पॅकेट्स वाटप व नियोजन असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.