collector jalaj sharma esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News |आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : चीन, जपान, कोरिया व अमेरिकेत कोविड सदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी श्री. शर्मा अध्यक्षस्थानी होते. (Collector Jalaj Sharma appeal Health system should be ready about corona Dhule News)

अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कंचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त के. एस. देशमुख, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. शर्मा यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

त्याचबरोबर जिल्ह्यात मागील कोविड लाटेचा आढावा घेऊन सध्या उपलब्ध असलेले ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, कॉन्सेट्रेटर, उपचारासाठी उपलब्ध बेडसची संख्या, लसीकरणाची मात्रा, मास्क, टेस्टिंग किटस् आदी बाबींचाही आढावा घेतला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

जिल्हा प्रशासनाने कोविडच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी, तर लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT