Diwali Festival  esakal
उत्तर महाराष्ट्र

Aanandacha Sidha : 2 लाख कुटुंबांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

आनंदाचा शिधा: 2 लाख कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' योजनेमध्ये मिळवा अद्याप १०० रुपयांत ६ वस्तू

सकाळ वृत्तसेवा

Aanandacha Sidha : जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लाख ६७ हजार २०० पात्र शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त शासनाकडून १०० रुपयांत ६ वस्तु असलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.(Collector Manisha Khatri statement of 2 lakh families will get anandacha sidha nandurabar news )

जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त दिवाळीमध्ये पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे ६ शिधाजिन्नस संच मिळणार आहेत.

गोरगरीब कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे. सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढले की, सर्वसामान्य कुटुंबांची अडचण होते. याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा

शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

हे असतील पात्रताधारक

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असून आनंदाचा शिधा वाटपासाठी जिल्ह्यात पुरेसा धान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये ६ शिधाजिन्नस संच मिळणार आहे. हे साहित्य खुल्या बाजारात किमान ३०० ते ३५० रुपयांचे आहे.

दिवाळी उत्सवानिमित्त वितरित करावयाचा संच २५ ऑक्टोबर, २०२३ पासून सुरू झाला असून ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत तो मिळू शकेल. जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार २०० पात्र कुटुंबांना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे. हे संच पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतील.

दृष्टिक्षेपात वितरण

- नंदुरबार : ५८ हजार ३५४

-नवापूर : ४८ हजार ५०१

- शहादा : ६५ हजार ६२३

- तळोदा : २७ हजार ५१५

- अक्कलकुवा : ३९ हजार ४९९

- अक्राणी : २७ हजार ७०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT