Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसाभा मतदारसंघांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात १२ लाख ७२ हजार १५० मतदार आहेत.
त्यात सहा लाख ३५ हजार ६०१ पुरुष, सहा लाख ३६ हजार ५३८ महिला, तृतीयपंथी ११ व ४१३ सैनिक मतदार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे. (Collector Sawan Kumar statement of 12 lakh 72 thousand 150 voters in district nandurbar news)
भारतीय निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२४ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता.
त्यानुसार २६ ऑक्टोबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीविषयक दावे, हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी २६
ऑक्टोबर २०२३ ला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप मतदारयादीत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत १२ लाख ४० हजार ४५३ मतदारांचा समावेश होता.
त्यात पुरुष सहा लाख २१ हजार ३३४, महिला सहा लाख १९ हजार १११ व तृतीयपंथी आठ मतदारांचा समावेश होता. या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणीसोबत मृत, दुबार नावे असलेली व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली.
पुनरीक्षण कालावधीत ५४ हजार ३०५ मतदारांची नोंदणी झाली असून, २२ हजार ६०८ दुबार, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत.
तालुकानिहाय अंतिम मतदारयादी
क्रमांक मतदारसंघाचे नाव पुरुष स्त्री तृतीयपंथ एकूण मतदार सैनिक मतदार
-------------------------------------------------------------------------
१ अक्कलकुवा १,५३,५७४ १,५०,४०२ ६ ३,०३,९८२ ४२
२ शहादा १,७०,५८९ १,६८,९०१ ३ ३,३९,४९३ १४२
३ नंदुरबार १,७१,०१७ १,६८,८७४ २ ३,३९,८९३ १६४
४ नवापूर १,४०,४२१ १,४८,३६१ ० २,८८,७८२ ६५
--------------------------------------------------------------------------
एकूण : ६,३५,६०१ ६,३६,५३८ ११ १२,७२,१५० ४१३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.