Taloda: NCP's Shahada-Taloda Legislative Assembly President Kunal Padvi while giving a statement to engineer Nitin Vasave minus the complaint. esakal
उत्तर महाराष्ट्र

Road Construction : खरवड ते बोरद रस्ता निकृष्ट? सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील खरवड ते बोरद या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत असून या कामासाठी आदिवासी विकास विभागाकडून विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Complaint about poor quality road construction from Kharwad to Borad at Pwd nandurbar news)

मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे अभियंता नितीन वसावे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तसेच, सदर रस्त्याची कामाची चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की खरवड ते बोरद हा ३ हजार ४०० मीटर रस्ता आदिवासी विकास विभागाच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला असून हा निधी देखील या कामासाठी वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी साधारणतः ४२ लाखापर्यंत निधी प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियुक्त संबंधित ठेकेदाराकडून होत आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून घालून देण्यात आलेल्या निकषानुसार हे काम होताना दिसून येत नाही. बोरद पासून काही अंतर पुढे गेल्यावर हा रस्ता आधी चांगल्या अवस्थेत होता, त्यामुळे या रस्त्याच्या त्याठिकाणी खर्च करण्याची आवश्यकता नव्हती.

तोच खर्च वाचवून संबंधित ठेकेदाराने हा रस्ता उच्च प्रतीचा बनवला असता तर या रस्त्याचे काम अधिक चांगले झाले असते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील साईड पट्ट्याही मुरुम न टाकता मातीनेच भरल्या जात आहेत.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी असे तक्रारीत नमूद केले आहे. ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे अभियंता नितीन वसावे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT