Two days ago, water blackened in houses in Motinagar area on Sakri Road.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात विलंबासह दूषित पाणी; दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर शहरात अपेक्षेप्रमाणे पाणीपुरवठ्याची समस्याही उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध भागात नियमित वेळापत्रकापेक्षा उशिरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. (Complaints of citizens of supply of Contaminated foul smelling and black water dhule news)

तसेच काही भागात दूषित, काळपट पाणीपुरवठा होत असल्याच्याही तक्रारी आहेत. प्रभागांमध्ये पाण्यासह इतर विविध समस्या असल्या तरी सत्ताधारी नगरसेवक सध्या उघडपणे तक्रारी करण्यात धजावत नसल्याचेही पाहायला मिळत आहे.

शहरात एव्हाना पाण्याचा प्रश्‍न नवीन नाही. विशेषतः विविध कारणांनी विलंबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण असतात. त्या-त्या भागातील नागरिक आपल्या प्रभागातील नगरसेवकांना याचा जाब विचारतात. यापूर्वी सत्ताधारी नगरसेवकांकडूनच हे प्रश्‍न महासभा, स्थायी सभेत उपस्थित करण्यात आले आहेत.

काही नगरसेवकांनी तर पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही तर आंदोलनाचा इशारा देखील दिला. जेथे सत्ताधारी नगरसेवकांकडूनच तक्रारी होतात, तेथे विरोधकांकडून होणे स्वाभाविक आहे. दरम्यान, आता उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मागील काळात वादळ, पावसामुळे वीजपुरवठा खंडित होणे, त्यापूर्वी जलवाहिनी फुटल्याने समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला. याबाबत महापौरांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना उपाययोजनांच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, पाण्याच्या या प्रश्नावरून आंदोलनेही होत आहेत.

दूषित पाण्याची समस्या

विलंबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबरोबरच काही भागात दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मागील स्थायी समिती सभेत एमआयएमच्या नगरसेविका नाजियाबानो पठाण यांनीही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रारी केली होती.

दरम्यान, आत्ताही काही भागात दूषित, काळपट, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी साक्रीरोड भागातील मोतीनाला परिसरातही असाच पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

काळपट पाणी कसे भरावे, ते पाणी प्यावे कसे असा प्रश्‍न पडतो असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही भागात सुरवातीला असे पाणी येते नंतर थोडे बरे पाणी येते. अर्थात जलवाहिन्यांना लिकेज अथवा तत्सम समस्या असल्याशिवाय असा प्रकार होत नाही. त्यामुळे याप्रश्‍नी लक्ष घालण्याची गरज आहे.

सत्ताधाऱ्यांची गोची

यापूर्वी विलंबाने पाणीपुरवठ्यासह इतर विविध समस्यांवर सत्ताधारी नगरसेवकांकडूनच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या, अर्थात आत्ताही काही नगरसेवक अशा तक्रारी करतात. तुलनेने समस्यांचा हा पाढा मागील काही काळापासून कमी झाल्याचे दिसते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा पाढा नको, त्यातून पक्षाचीच प्रतिमा मलिन होईल या उद्देशाने तक्रारींचा सूर कमी पडल्याचे दिसते. दुसरीकडे समस्या आहेत, नागरिक जाबही विचारतात. त्यामुळे विशेषतः सत्ताधारी नगरसेवकांची गोची झाल्याचे पाहायला मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT