Dhule: Employees of the health system during a permanent service protest at the collector's office esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कायम सेवेसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध जागा भरल्या जातील. या जागांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. तसेच शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

आंदोलनाद्वारे विविध समस्यांकडे लक्ष वेधताना आंदोलकांनी न्यायालयीन लढ्याचा इशाराही दिला. महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक २०१४ पासून मानधनावर आहेत. (Contractual health workers Agitation for permanent service Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

कोविड काळात सर्वांनी जिवावर उदार होत रुग्णसेवा केली. पिंपरी- चिंचवड महापालिकेने राष्ट्रीय आरोग्य योजनेतंर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले. महापालिकेला आरोग्य विभागात पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यामुळे या जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्राधान्य द्यावे, कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नाही, तर न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा डॉ. सोनल वानखेडे, डॉ. प्रीती अग्रवाल, डॉ. प्रशांत मराठे, डॉ. अर्चना आगळे, डॉ. सूरज पावरा, लेखा व्यवस्थापक हर्षाली चौधरी, पुनम जयस्वाल, नम्रता पावटे, सुमीत चौधरी, सलमा बानो अन्सारी, कल्याणी गावित, श्वेता कदम, रंजिता पावरा, भारती मासुळे, ज्योती कदम, सुरेखा कांबळे, दीप्ती घुगे, प्रियंका वसावे, प्रियंका सूर्यवंशी, विशाखा पाखले, मीनाक्षी वाघ आदींनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT