धुळे : कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सकडून अवाजवी बिले आकारण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध विनाविलंब कायदेशीर कारवाईचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे. यासाठी प्रशासनाने भरारी पथक नियुक्त केले आहे. देवपूर भाग व शहर भाग अशा दोन भागांसाठी दोन नियंत्रण अधिकाऱ्यांसह स्थानिक निधी लेखापरीक्षण विभाग व महापालिकेतील २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे.
खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार हॉस्पिटल्स व रुगणवाहीकांकडूनही वाजवी शुल्क आकारणीबाबत अंमलबजावणीच्या तपासणीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
शिस्तभंगाची होणार कारवाई
वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही, याबाबत खातरजमा करावी, आकारावयाचे कमाल दर हॉस्पिटल्सच्या दर्शनी भागात लावणेबाबत तपासणी करावी, खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करावी, आकारले जाणारे कर, खासगी वाहने/रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर विहित आहेत किंवा नाही याची तपासणी करावी व अवाजवी बिल आकारणीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध विनाविलंब कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश या पथकांना दिले आहेत. आदेशाचे पालन करण्यात हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही पथकांना दिला आहे.
पथकातील अधिकारी असे :
शहर भाग : नियंत्रण अधिकारी- सहाय्यक आयुक्त विनायक कोते, अध्यक्ष- सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी दि. शा. अवसरमल, सचिव- वरिष्ठ लेखा परीक्षक र. श. भुजबळ.
देवपूर भाग : नियंत्रण अधिकारी- सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, अध्यक्ष- सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी भ. बु. कोळपे, सचिव- वरिष्ठ लेखा परीक्षक श. शि. शिरसाट. दोन्ही पथकातील सदस्य असे ः कनिष्ठ लेखा परीक्षक स्व. वि. पवार, कनिष्ठ लेखा परीक्षक नि. श. जाबळे, कनिष्ठ लेखा परीक्षक न. प्र. शिंदे, कनिष्ठ लेखा परीक्षक वि. म. पेंडारकर, मनपाचे प्रभारी लेखाधिकारी प्रदीप नाईक, प्रभारी सहाय्यक कर मूल्य निर्धारण अधिकारी बळवंत रनाळकर, भांडारपाल राजेंद्र माईनकर, वसुली निरीक्षक शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, अजय देवरे, लिपिक अभिजित पंचभाई, किशोर चव्हाण, गणेश काकडे, कनिष्ठ अभियंता पराग ठाकरे, निखिल टकले, फार्मासिस्ट सुनील माकडे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.