Cotton fetched price of 7100 per quintal dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Cotton Price : पांढऱ्या सोन्याचे भाव फुटले... @ 7100; पूर्वहंगामी कापसाची खरेदी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dhule Cotton Price : श्रावण एकादशीच्या मुहूर्तावर कापसाला प्रतिक्विंटल सात हजार शंभरचा भाव मिळाला. येथील कापसाच्या बाजारात पूर्वहंगामी लागवड झालेल्या कापसाची खरेदी सुरू केली आहे.

या वर्षी पावसाअभावी उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प आहे. पूर्णतः खरीप हंगाम वाया गेला आहे. कोरडवाहू कपाशीची वाढ अद्यापही एक फुटाहून अधिक झालेली नाही.

आता व्यापाऱ्यांची बागायती कापसावरच मदार राहणार आहे. दुष्काळी स्थितीत कापसाचे भाव दहा हजारी पार करतील, अशी शेतकऱ्याना अपेक्षा आहे. (Cotton fetched price of 7100 per quintal dhule news)

धुळे तालुक्यासह जिल्ह्यात कपाशीचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी कापसाच्या भावात मोठी घसरण झाली होती. बऱ्याचशा शेतकऱ्यानी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने मागील वर्षीचा कापूस विकलेला नाही. या वर्षी तरी भाव वाढतील म्हणून कापसाचे क्षेत्र वाढलेले आहे. पावसाअभावी कोरडवाहू क्षेत्र करपून गेले आहे. वाढ तर एक फुटापेक्षा अधिक झालेली नाही. बागायती कपाशीचे क्षेत्र बहरलेले आहे.

कापडणेच्या व्यापाऱ्यांकडून सात हजारांवर भाव

येथे दहापेक्षा अधिक कापसाचे व्यापारी आहेत. त्यांनी खेडा पद्धतीने कापसाची खरेदी सुरू केली आहे. व्यापारी अरुण पाटील यांनी काटापूजन मुहूर्तावर प्रतिक्विंटल सात हजार शंभर रुपये याप्रमाणे कापसाची खरेदी केली. महेश पाटील, विशाल पाटील, जगन्नाथ माळी, छोटू वाणी, चूडामण पाटील, माजी सरपंच भटू पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

बागायती कापसाची वेचणी सुरू झाली आहे. पूर्वहंगामी अर्ली व्हरायटीचा कापूस खरेदी करण्यासाठी इतर व्यापाऱ्यांनीही प्रतिक्विंटल साडेसहा हजारांचा भाव देत खरेदी सुरू केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुष्काळी स्थिती...

धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. केवळ पावसाळी वातावरण आहे, पण अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. कडधान्य उत्पादन आलेच नाही. ऐंशी टक्के घट झाली आहे. बाजरी, ज्वारी व मक्याची कणसे करपली आहेत. दाणेच भरलेले नाहीत. अशा स्थितीत कापसाचे भाव वाढतील, अशी बागायतदार शेतकऱ्यांना आशा आहे.

जुन्या कापसाला अधिक भाव

जुना कापूस : प्रतिक्विंटल ६५०० ते ७५००

नवा कापूस : प्रतिक्विंटल ५५०० ते ६५००

"मुहूर्ताची खरेदी थोडी अधिक असते. मात्र तो खरा भाव नसतो. या वर्षी नव्यापेक्षा जुन्या कापसाचे भाव अधिक आहेत. शेतकऱ्यांनी जुना कापूस विकणे आवश्यक आहे. बाजारपेठ स्थिर नसते." -अरुण पाटील,कापसाचे ज्येष्ठ व्यापारी, कापडणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT