Farm laborers picking cotton in the fields of the area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News: पांढऱ्या सोन्याच्या वेचणीस प्रारंभ; कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : खरिपाच्या हंगामात तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीला पसंती देत, सुमारे आठ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती.

आता ठिकठिकाणी शेतात कापसाची बोंडे परिपक्व झाल्याचे दिसून येत आहे, यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस वेचणीला शेतकऱ्यांकडून सुरवात करण्यात आली आहे. (Cotton picking was started by farmers nandurbar news)

दरम्यान, यंदा कापसाला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तळोदा शहरातील व तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच कमी कालावधीत चांगला मोबदला देणाऱ्या पिकांना पसंती देत आहेत. चांगला भाव तसेच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून काही वर्षांपासून कापसाकडे बघण्यात येत आहे.

नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. त्यामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील प्रतापपूर, रांझणी, चिनोदा, बोरद, मोड यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात जवळपास आठ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती.

दरम्यान, शेतकरी मोठे कष्ट घेऊन कापसाचे संगोपन करीत असतात. तसेच कपाशीला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्चही येत असतो. तसेच शेतकरी घाम गाळून कपाशीचे पीक जगवितात. मात्र ज्या वेळेस कापूस वेचणीस सुरवात होते त्याच वेळेस कापसाला योग्य भाव मिळत नाही, असा अनेक वर्षांपासूनचा शेतकऱ्यांच्या अनुभव आहे.

व्यापाऱ्यांकडून ओला कापूस असल्याचे तसेच पावसामुळे कापूस काळा पडल्याची कारणे देऊन कापसाची कवडीमोल खरेदी करण्यात येते. तसेच परिस्थितीमुळे शेतकरी बांधवदेखील व्यापारी जो भाव देतील त्यात कापसाची विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नसल्याचे दिसून येते.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी पांढरे सोने म्हणून समजल्या जाणाऱ्या कापसाला यंदा योग्य हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा तळोदा परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

"अनेक संकटांवर मात करीत मोठ्या प्रयत्नांनंतर कापसाला जगवीत मोठे केले. आता कापूस वेचणीला सुरवात झाल्याने माझ्यासह परिसरातील शेतकरी सुखावला आहे. मात्र या वर्षी कापसाला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून चांगला आर्थिक फायदा होईल.''-रामदास मराठे, कापूस उत्पादक शेतकरी, चिनोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT