Crime against 6 officers after 2 years Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 6 अधिकाऱ्यांवर 2 वर्षांनी गुन्हा

राजनगाव (ता. साक्री) शिवारात विजेचा शॉक लागून सातवर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. एका कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : राजनगाव (ता. साक्री) शिवारात विजेचा शॉक लागून सातवर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. एका कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

त्यानुसार दोन वर्षांनी कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संदीप संजय सूर्यवंशी (रा. राजनगाव) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Crime against 6 officers after 2 years Dhule Crime News)

विशाल पिंपळे (रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार १८ नोव्हेंबर २०२० ला राजनगाव येथे वीजनिर्मितीच्या टॉवर क्रमांक २९५ जवळील ट्रान्स्फॉर्मरचे गेट उघडे होते. तेथे सुरक्षारक्षक नसल्याने विद्यार्थी शेतात खेळत होते.

गेट उघडे असल्याने ते आत शिरले. त्यात संदीप सूर्यवंशी हा ट्रान्स्फॉर्मरवर चढला व त्याने बुशिंगला हात लावला. त्यामुळे तो विजेचा धक्का बसल्याने भाजला. त्याला शेतात काम करणाऱ्या आई-वडिलांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेले.

तेथे उपचार शक्य नसल्याने त्याला सुरतच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान १९ नोव्हेंबर २०२० ला संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित कंपनीचे सुनील नंदलाल चावला (रा. मुंबई).

सुमीत मारोतराव बहादेकर (रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री), शरमसिंग (रा. मगरपट्टा, हडपसर, पुणे), तुकाराम सुकदेव जावरे (रा. वाघोदा रोड, नंदुरबार), नितीनकुमार ग्यानदेव लांडे (रा. अवधूत पार्क, नंदुरबार) व ज्ञानेश्वर पंडित पवार (रा. आमखेल, ता. साक्री) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT