crop insurance scheme latest marathi news sakal
उत्तर महाराष्ट्र

Crop Insurance Scheme : जिल्हा बँकेच्या साडेपंधरा हजारांवर सभासदांना पीकविमा लागू

सकाळ वृत्तसेवा

Crop Loan News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे १५ हजार ५७५ सभासदांसाठी १७ हजार २३६ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा काढला आहे. यात धुळे जिल्ह्यातील ११ हजार ५१ तर नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ५२४ सभासदांचा समावेश आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वंकष पीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ विमा योजनेत शेतकऱ्यांनी एक रुपया मात्र भरणा करून विमा प्रस्ताव पीएमएफबीवाय पोर्टलवर नोंदवायचा होता. (Crop insurance applicable to members of Zilla Bank on fifteen thousand dhule news)

या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. कदमबांडे व संचालक मंडळ यांनी २७ जुलैच्या संचालक मंडळ बैठकीत शेतकरीहिताचा धोरणात्मक निर्णय घेऊन बँकेने खरीप हंगाम-२०२३ या वर्षात १ एप्रिल ते ३१ जुलैअखेर पीककर्ज वाटप करण्यात आलेल्या ज्या सभासदांनी पीकविम्याचा प्रस्ताव बँकेकडे भरून दिला.

अशा सर्व कर्जदार सभासदांतर्फे एक रुपया मात्र बँकेच्या स्वनिधीमधून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी पीकविमा कंपनीकडे भरणा केला आहे. तसेच शासन आदेशानुसार केंद्र सरकारच्या पीएमएफबीवाय पोर्टलवर शेतकऱ्यांचा पीकविमा प्रस्ताव बँकेच्या स्वखर्चाने बँकेने स्वत: अपलोड करून नोंदविला.

सर्वाधिक विमा कपाशीचा

सर्वंकष पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम-२०२३ चा पीकविमा व विमा हप्ता विमा कंपनीकडे जिल्हा बँकेमार्फत नाममात्र एक रुपया भरून पीएमएफबीवाय पोर्टलवर दाखल झाला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत बँकेच्या १५ हजार ५७५ सभासदांसाठी पीकविमा काढण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक १४ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र कापूस पिकासाठी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यापाठोपाठ सोयाबीनसाठी ३९०.८१ हेक्टर, मका ४५६.३६, कांदा ६९.३५ व इतर पिकांसाठी एक हजार ४४१.४८ हेक्टर क्षेत्राकरिता पीकविमा उतरविण्यात आला आहे. जिल्हा व पीकवार पीकविमा क्षेत्र हेक्टरी असे ः धुळे ः कपाशी- ११ हजार २६४, सोयाबीन- १२.६४, मका- ४१८.६२, कांदा- ६६.२५, इतर- ३१९.४९. नंदुरबार ः कपाशी- चार हजार ४३१, सोयाबीन- ३७८.१७, मका- ३७.७४, कांदा- ३.१० इतर- एक हजार १२१.९९.

बँकेच्या सुविधांचा लाभ घ्या

बँकेने नंदुरबार जिल्ह्यांतील अक्राणी तालुक्यातील सुमारे ६६१ वनपट्टाधारक सभासदांचादेखील पीकविमा प्रस्ताव बँकेतर्फे विमा कंपनीकडे दाखल केला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील पावसाची चिंताजनक परिस्थिती पाहता कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने शेतकरीहिताचा निर्णय घेतला.

दरम्यान, शेतकऱ्यांना जिल्हा बँकेत अधिकाधिक ठेवी ठेवून बँकेकडील सर्व सोयी-सुविधा व डिजिटल प्लॅटफार्मचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT