Ner: Wheat washed away due to unseasonal heavy rains in the area esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture Update : नेर परिसराला अवकाळीच्या तडाख्याने गव्हाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

कापडणे/नेर : नेर, खेडे, कुसुंबा परिसरात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला अवकाळी पावसाने जोरदार तडका दिला. वादळी वाऱ्यामुळे गहू पूर्ण भुईसपाट झाला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने हातचा गेला.

आता अवकाळीने शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळा आणली आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामेकरून सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Damage to wheat due to unseasonal blast in Near area Dhule News)

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आहे. आज (ता. ३०)धुळे शहरापासून दहा बारा किमीवर असलेल्या नेर परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा तडका बसला. शेकडो एकरवरील गहू आणि हरभऱ्यासह मक्याचेही नुकसान झाले आहे. गहू भुईसपाट झाला आहे. परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

खरीप हातचा आता रब्बीही..!

गेल्या खरीप हंगामाच्या उत्तरार्धात एक महिना सातत्यपूर्ण पाऊस आणि अतिवृष्टीही झाली होती. परिणामी खरिपाचे सत्तर टक्के नुकसान झाले होते. आता रब्बीच्या नुकसानीने शेतकरी हतबल झाले आहेत. निराशा व्यक्त होत आहे.

धुळे शहरातील काही भागात शिडकावा

सायंकाळी धुळे शहरातील काही भागात पावसाच्या काही मिनिटे शिडकावा झाला. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

"अवकाळी पावसाने गहू आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला आहे. शासनाने पंचनाम्याचे आदेश देवून तत्काळ मदत द्यावी. शेतकऱ्यांनी उभारी द्यावी."

- शंकर खलाणे, माजी सरपंच (नेर ता. धुळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT