Assistant Police Inspector Nilesh Wagh inspecting a stolen house esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News: 4 घरांत धाडसी चोरी; नायब तहसीलदारांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

नवापूर (जि. नंदुरबार) : शहरात चार घरांत घरफोडी झाल्याची घटना रविवारी घडली. सराईत चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत.

नायब तहसीलदारांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने लंपास, माजी आमदारकन्या शिक्षिकेच्या घरात चोरीचा प्रयत्न, कृषी अधिकारी व निवृत्त शिक्षकांच्या घरी चोरीचा प्रयत्न या घरफोड्यांच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण झाले आहे. पोलिसांना मात्र वाराही लागत नाही, अशी चर्चा शहरात सुरू आहे. (Daring burglary in 4 houses Gold and silver jewelery looted from house of Naib Tehsildar Nandurbar Crime News)

नवापूर शहरात थंडीचे प्रमाण वाढले, की चोरीच्या घटनादेखील वाढतात. शहरातील वेडूभाई गोविंदभाईनगरमध्ये दोन घरांत घरफोडी झाली. आदर्शनगरातील दोन घरांत घरफोडी झाली आहे. चार बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत.

बऱ्याच दिवसांपासून घरफोडीचे सत्र थांबले होते; परंतु आता पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांना चोरटे आव्हान देत असल्याचे समोर येत आहे.

नवापूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ जानेवारीच्या रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान वेडूभाई गोविंदभाईनगरात दोन घरांची घरफोडी करण्यात आली. माजी आमदारकन्या शिक्षिका यांच्या घरातील कडीकोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर शेजारी असलेल्या घराकडे चोरट्याने मोर्चा वळविला. यात वनिता विद्यालयातील शिक्षिका पुष्पा रिनेश गावित शैक्षणिक सहलीला गेल्या असता अडीचच्या सुमारास त्यांचे पती घराला कुलूप लावून त्यांना घेण्यासाठी शाळेत गेले.

त्यादरम्यान तासाभरातच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून डल्ला मारला. घरात वरच्या मजल्यावर गोदरेज कपाटातून सासूचे पारंपरिक चांदीचे दागिने व त्यांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. साधारण एक लाख ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या संदर्भात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

आदर्शनगरात रविवारी रात्री दोन घरांत चोरीचा प्रयत्न झाला. निवृत्त लक्ष्मण रुबजी वसावे (रा. कोळदा) व स्वस्तिक अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर कृषी विभागातील सुशील कोकणी गावाला गेले असता त्यांच्या घरात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी केली.

घराच्या लोखंडी दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरातील पेटी, गोदरेज कपाट, लाकडी पलंग, घरातील सामान चोरट्याने अस्ताव्यस्त केले आहे. घरातून नेमके काय गेले अजून घरमालकाला कळू शकलेले नाही.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांनी घरफोडी झालेल्या ठिकाणी पाहणी केली. नवापूर शहरात चार ठिकाणी झालेल्या घरफोड्यांत एकाच पद्धतीने कडीकोंयडा तोडून बंद घरांना लक्ष्य करून चोरी करण्यात आली आहे. चोरटे सराईत असल्याने चोरी करताना कोणालाही भणक लागू दिली नाही.

गस्तीचा मागणी

नवापूर पोलिस मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग होते, त्याचप्रमाणे रहिवासी भागातदेखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरातील घरफोडीचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. नवापूर पोलिसांनी तीन पथके चोरट्यांचा शोधात रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT