खापर : वालंबा शासकीय अनुदानित आश्रमशाळा येथील विद्यार्थ्याचा शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीने जबर धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (ता.२१) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, एकलुताएक मुलगा गेल्याने आश्रमशाळा प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त करीत पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते.
सद्यःस्थितीत स्थित असलेल्या देव मोगरा पुनर्वसन गावाजवळ अतिदुर्गम भागातील वालंबा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळा स्थलांतरित झाली आहे. या आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा मु.सेलगदा (ता. धडगाव) येथील विद्यार्थी मदन रमेश पाडवी (वय ९) हा २० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आपले जेवण आटोपून जवळील रस्त्यावर पायी जात असताना अक्कलकुवाकडून भरधाव वेगात येणारी दुचाकी (क्रमांक एम एच ३९ ए एल ३२८२) वरील स्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकी (एम एच ३९ पी २७५३) हिला ठोस दिली. यात रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यावर दुचाकी धडकून तो जखमी झाला. (Death of Ashram school students Bike crash in front of school at Wallamba Refusal to take dead body of parents Nandurbar News)
विद्यार्थ्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याच्या मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचे विच्छेदन अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रमशाळा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आपल्या मुलाच्या मृतदेह अंतिमविधीसाठी घेण्यास नकार दिला.
पालकांची समजूत काढून संध्याकाळी साडेपाचवाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. वडील रमेश सिंगा पाडवी यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मुलाच्या अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला होता. अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार जितेंद्र महाजन तपास करीत आहेत.
दुसऱ्यांदा अपघाताची घटना
आश्रमशाळा अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याच्या लगत असून या रस्त्यावर मोठी वाहतूक असते. यापूर्वी देखील एका विद्यार्थ्याचा अपघात होऊन पायाला इजा झाली होती. काल झालेल्या अपघातात बालकाच्या अपघाती मृत्यू झाल्याने या आश्रमशाळेला संरक्षण भिंत बांधून विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. आश्रमशाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाहक विद्यार्थ्यांच्या जीव गेल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
"माझ्या मुलाचे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर साडेसहा वाजेला रस्त्यावर कसा का गेला. माझ्या मुलाच्या मृत्यूस शालेय प्रशासन जबाबदार असून यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी."
रमेश सिंगा पाडवी, मयत विद्यार्थ्याचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.