Dhule: Divyang Jitendra Singh Girasse while on hunger strike for justice near Cumaine Club esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अध्यक्षासह आरोपींना अटकेची मागणी; दिव्यांग लिपिकाचे बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शैक्षणिक संस्थेतील अन्यायप्रकरणी दिव्यांग वरिष्ठ लिपिक जितेंद्रसिंग गिरासे यांनी प्रजासत्ताक दिनापासून येथील क्युमाइन क्लबजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, योग्य नाही मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वार (ता. धुळे) येथील शिवप्रभू शिक्षण संस्थेच्या प्रतिभा माध्यमिक विद्यालयात दिव्यांग वरिष्ठ लिपिकाने बोगस शिक्षकांना भरती करण्यासाठी सहकार्य केले नाही. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मंगलसिंग गिरासे यांनी या वरिष्ठ लिपिकाची पगारवाढ थांबून कार्यभार काढून घेतला. (Demand for arrest of accused including President Indefinite hunger strike of disabled clerk Controversy at Shiv Prabhu Shikshan Sanstha of War Dhule News )

संस्थेचे अध्यक्ष मंगलसिंग गिरासे यांनी संस्थेतील शिक्षकाला हाताशी धरून तीन शिक्षकांच्या रिक्त पदांप्रश्‍नी बनावट कागदपत्रे लावत नियुक्ती केली. कुठल्याही कार्यपद्धतीचा अवलंब न करता या बोगस शिक्षक नेमणूक करण्यास मान्यता प्रस्तावदेखील तयार केले.

अध्यक्षांनी मुख्याध्यापकाच्या शिक्क्यावर स्वतःची स्वाक्षरी करत तीन शिक्षकांच्या बोगस नेमणूक मान्यता करीत बनावट प्रस्ताव तयार केला. शिक्षणाधिकारी कार्यालयाने तो मंजूर केला. नंतर वेतन काढत शासनाची फसवणूक केली, अशी वरिष्ठ लिपिक जितेंद्रसिंग गिरासे यांची तक्रार आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष मंगलसिंग गिरासे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

मात्र, आरोपींवर ८४ दिवसांत पोलिसांकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. याउलट फिर्यादी गिरासे यांना वारंवार बोलावून प्रश्नांची सरबत्ती पश्‍चिम देवपूरचे पोलिस करतात, असाही त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वादग्रस्त शिक्षकांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली असून, जाबजबाब सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT