Dhule Crime News : निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे घर रिकामे करून देण्यासाठी त्याच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी संशयित चौघांवर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (Demanding ransom of Rs 10 lakh from retired medical officer to vacate house dhule crime news)
छडवेल कोर्डे (ता. साक्री) येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रतनलाल भटनागर (वय ७१) यांनी देवपूर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दाखल केलेल्या खटल्यामध्ये तडजोड करण्याकामी त्यांना विलास निंबाजी शिंदे याच्यासह चौघांनी देवपूरमधील न्यू एकता हाउसिंग सोसायटीतील प्लॉट क्रमांक ५१ येथे बोलविले.
तेथे विलास शिंदे, त्याची पत्नी प्रतिभा शिंदे, मुलगा भूषण शिंदे यांनी फिर्यादीच्या मालकीचे घर आमच्या नावावर करून द्या किंवा दहा लाख रुपये द्या, तेव्हाच तुमचे घर रिकामे करेल, अशी धमकी दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान २०१२ ते २०१९ मध्ये फिर्यादीने धमक्यांना घाबरून खंडणी स्वरूपात आठ लाख रुपये दिले आहेत.
सहा महिन्यात घर रिकामे करून देतो, असे संशयितांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी अद्याप घर रिकामे केले नाही. त्यामुळे शिंदे परिवारासह शिवाजी भाईदास देसले, अशा चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.