Dhule Dengue Disease : फक्त घर आणि परिसरातच स्वच्छ पाण्यावर राहणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाने अर्थात डेंगीने शहरासह जिल्ह्यात पाय पसरण्यास सुरवात केली आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जाते.
तथापि, जिल्हा शासकीय यंत्रणेकडून झालेल्या रक्त नमुने तपासणीत शहरातील रासकरनगर येथील तरुण आणि (स्व.) गौरव जगताप यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा, त्यांना डेंगी नसल्याचा दावा यंत्रणेने केला. असे असले तरी डेंगी शहरासह जिल्ह्यात नाही, अशीही स्थिती नसल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले. (dengue disease is started spreading in dhule news)
पावसाअभावी अस्वच्छता पसरली आहे. पावसामुळे गटारींसह घर व परिसरातील डासांची उत्पत्तीस्थाने वाहून जातात; परंतु यंदा पावसाअभावी डासांची उत्पत्तीस्थाने टिकून आहेत. त्यात फक्त घर व परिसरातच स्वच्छ पाण्यावर राहणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाने अर्थात डेंगीने पाय पसरण्यास सुरवात केली आहे.
नागरिकांनी कूलरमधील पाणी, टायर वा साठवणुकीची भांडी, ठिकाणे, फ्लॉवर पॉटमधील पाणी वा अशा प्रकारच्या वस्तू, साधनांमध्ये पाणी असल्यास ते रोज काढणे व अशी साधने स्वच्छ ठेवणे, आठवड्यातला एखादा दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे झाले आहे.
जनजागृतीवर भर
डेंगीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा हिवताप निर्मूलन विभागातर्फे वेळोवेळी घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. यात डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जात आहेत. फॉगिंग, ॲबेटिंग आदी उपाययोजनांना गती देण्याची वेळ आली आहे. नागरिकांनीही शासकीय यंत्रणेकडून आवाहनांना व स्वच्छतेबाबत सूचनांना प्रतिसाद देण्याची आवश्यकता व्यक्त होते. यंत्रणेकडून जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
त्यात माहिती पत्रकांचे वाटप, यात्रेत प्रबोधनपर स्टॉल व अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. खासगी दवाखाने, रुग्णालयांकडून डेंगीसदृश रुग्णांची माहिती वेळोवेळी संकलित केली जात आहे.
खासगी वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या रक्त नमुन्यांच्या तपासणीऐवजी राज्य सरकार शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडील नमुने तपासणीचा अहवाल ग्राह्य मानते.
त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली गेली असून, ती एखाद्या रुग्णाचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला तर त्याचे नेमके कारण काय याचा अहवाल सादर करते. त्यानुसार शहरातील रासकरनगर व गौरव जगताप यांचा रक्त नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असे जिल्हा हिवताप निर्मूलन विभागाने सांगितले. डेंगी पाय पसरत असल्याने शासकीय यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन यंत्रणेने केले.
डेंगीच्या रुग्णांची स्थिती
जानेवारी ते सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा हिवताप निर्मूलन विभागाकडून महापालिका क्षेत्रात ४९८, तर उर्वरित जिल्ह्यात ३९९ जणांचे डेंगीसदृश रक्त नमुने तपासणीसाठी घेतले. असे एकूण ८९७ पैकी ७८ नमुने डेंगी पॉझिटिव्ह आले.
यात महापालिका क्षेत्रात जुलैमध्ये ४, ऑगस्टमध्ये २२, सप्टेंबरमध्ये १९ असे एकूण ४५ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह होते. उर्वरित जिल्ह्यात मार्चमध्ये २, जून २, जुलै ४, ऑगस्ट १३, सप्टेंबरमध्ये १२, असे एकूण ३३ रुग्ण डेंगीबाधित होते. यानुसार महापालिका क्षेत्रातील ४५ व उर्वरित जिल्ह्यातील ३३ मिळून एकूण ७८ रुग्ण डेंगीबाधित आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.