Dhanadaimata Yatrotsav esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhanadaimata Yatrotsav : ‘धनदाई माता की जय!’ म्हसदीत भाविकांच्या गर्दीचा महापूर...

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी (जि. धुळे) : येथील आदिमाया, कुलदैवत धनदाईमातेच्या (Dhanadaimata Yatrotsav) यात्रेस बुधवार (ता. २९)पासून प्रारंभ झाला.

मध्यरात्रीपासून ‘धनदाई माता की जय!’च्या गजराने मंदिर परिसर दणाणून निघाला. सुमारे दोन लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. (Dhanadaimata Yatrotsav started from 29 march dhule news)

धनदाईदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी झालेली गर्दी आणि नवसपूर्तीसाठी लहान मुलाचे जावळ काढताना भाविक.

दुपारी उशिरापर्यंत गर्दीचा महापूर गजबजून गेला होता. ७७ पेक्षा अधिक कुळांचे कुलदैवत असलेल्या भाविकांनी नवसपूर्ती व दर्शनासाठी गर्दी केली. नवसपूर्तीसाठी २७७ बोकडांचा बळी देण्यात आला, तर त्यापेक्षा जास्त भाविकांनी पुरणपोळी, दाळबट्टीचा नैवेद्य दाखविला. दिवसभर ४६१ नवसपूर्तीचे कार्यक्रम झाले.

महाआरती व ‌‌का‌‌कड आरतीची मिरवणूक

धनदाईदेवीच्या मंदिरात पहाटे साडे पाचला परंपरेनुसार सामुदायिक काकड आरती झाली. तत्पूर्वी गावातील गांधी चौकापासून आरतीची मिरवणूक मंदिरापर्यंत आणण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सदस्या धरती देवरे, म्हसदीच्या सरपंच शैलजा देवरे, गुजरातमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या पत्नी गंगाबेन पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली.

बोरीस येथील निखिल देवरे, मंगलाताई पाटील, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, कोशाध्यक्ष उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे, संचालक गंगाराम देवरे, रघुनाथ देवरे, सुधाकर देवरे, हिंमतराव देवरे, निरंजन देवरे, नरेंद्र देवरे, अनिल देवरे, सुरेश जैन, डॉ. अमितकुमार चव्हाण, एलसीबी विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, संतोष हिरे, दिलीप खोंडे, योगेश चव्हाण, ज्येष्ठ पुरोहित श्रीकांत देशपांडे, गणू महाराज, शेखर जोशी, प्रदीप जोशी, उमाकांत देशपांडे, मयूर कुलकर्णी, कल्पना देवरे, रत्नप्रभा देवरे(साक्री), प्रभारी पोलिसपाटील रवींद्र बेडसे, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. दुपारी आमदार मंजुळा गावित यांनी मंदिर परिसरात भेट देत दर्शन घेतले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

रणरणत्या उन्हात उत्साह

मध्यरात्रीपासून भाविकांनी खासगी बस, ट्रक, ट्रॅक्टर, जीप, पिकअप, क्रूझर, रिक्षा, दुचाकी यांसारख्या वाहनांनी मंदिर परिसर गाठला. रणरणत्या उन्हातही भाविकांचा उत्साह जाणवत होता. देवीजवळ मुला-मुलींचे जावळ, तर महिलांची लट देण्यात आली. नवसपूर्तीसाठी वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.

काही भाविकांनी नवसपूर्तीसाठी सोळा जिवंत बोकड, एक रेडा, कोंबडे देवीला अर्पण केले. अमरावती नदीपात्र मंदिर परिसरात स्वतंत्र वाहनतळ व अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध केल्याने वाहने सुरक्षित मार्गस्थ झाली. सायंकाळी तगतरावाची (लांगड) मिरवणूक काढण्यात आली.

शालेय विद्यार्थी व युवकांचे योगदान

साक्रीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, (कै.) सी. डी. देवरे माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, गावातील शेकडो युवक व विश्वेश्वर जीर्णोद्धार सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून दिवसभर सहकार्य केले.

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी व पुजारी दिवसभर गर्दीवर लक्ष ठेवून होते. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे, साक्री, मालेगाव आगारातर्फे जादा बस सोडण्यात आल्या. साक्री आगाराने प्रवाशांची सोय आणि बसस्थानक परिसरात मंडप टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT