Dhule News : शिंदखेडा येथील धनश्री हिने चित्रकलेचा छंद जोपासत त्याला मेहंदीची जोड देत आर्थिक उन्नती करण्यास सुरवात केली आहे. आज धनश्री स्वतःसह भावाचे शिक्षणही पूर्ण करीत कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे.
धनश्रीची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे.(Dhanashree gives financial strength to family through henna dhule news)
शिंदखेडा येथे राहणारी धनश्री ही विद्यार्थिनी एसएसव्हीपीएस महाविद्यालयात विज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षाला आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. अशा स्थितीत धनश्रीने चित्रकलेच्या आवडीचे रुपांतर मेंहदी रेखाटण्यात केले. यातूनच आर्थिकस्त्रोत निर्माण झाला आणि आज ती तिच्या स्वत:च्या पायावर उभी असून कुटुंबाला देखील आर्थिक हातभार लावत आहे.
आठवीपासून चित्रकलेचा छंद
धनश्रीला लहानपासूनच पाटीवर, वह्या पुस्तकांवर आडव्या, उभ्या, तिरप्या रेषा रेखाटण्याची सवय लागली. तिने आठवीपासून चित्रकलेचा श्रीगणेशा केला. अन जिद्दीने विविध कलाकृती रेखाटण्यास सुरवात केली. तिला शिक्षकांसह आई वडिलांचाही प्रतिसाद मिळाला. ती मैत्रीणींचेही हुबेहुब चित्र रेखाटू लागली. अन तेथूनच तिच्या चित्रकलेला मोठी कलाटणी मिळाली.
म्हणून मेंहदीकडे कल
धनश्री चित्र काढून दोन पैसे मिळत नाहीत. केवळ वाहवाह मिळते. ती विवाह सोहळ्यानिमित्ताने कापडणे येथे मामाच्या गावी आली. वधूच्या हातावर मेंहदी रेखाटणारी बाई पाच हजार घेवून गेली. तिथून मग तिने मेंहदीकडे आपला मोर्चा वळविला. अन दोन पैसे हातात खेळू लागले आहेत. त्यातून स्वतःसह भावाच्या शिक्षणालाही हातभार लावत आहे. कुटुंबालाही मोठी मदत होत आहे.
हुबेहुब वधू-वर रेखाटणी
धनश्री वधूच्या हातावर मेंहदीच्या वैविध्यपूर्ण कलाकृती रेखाटते. वधूवरांची रेखाकृती लिलया काढते. विविध महापुरूषांची चित्रे, मैत्रिणी आदींच्या कलाकृती रेखाटणीमुळे तिचे नाव तालुक्यात दूरवर पसरत चालले आहे.
''भविष्यात मेंहदीसह चित्रकलेचे क्लासेस सुरु करायचे आहेत. गरीब होतकरू मुलींना प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. विद्यार्थी दशेतच आईवडिलांना मदत करण्याचा स्वानंद वेगळाच आहे.''- धनश्री देसले, विद्यार्थीनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.