MLA Kunal Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे आयटीआय कार्यशाळेसाठी 10 कोटी 77 लाख रुपये मंजूर

Dhule News : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा दुरुस्तीसाठी शासनाने दहा कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा दुरुस्तीसाठी शासनाने दहा कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. दुरुस्तीच्या प्रस्तावास २६ फेब्रुवारीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे धुळे आयटीआय येथील सुमारे ५० वर्षे जुन्या कार्यशाळेची दुरुस्ती होणार असून, विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय दूर होणार आहे.

धुळे शहरातील देवपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुमारे ५० वर्षे जुनी असलेल्या कार्यशाळा क्रमांक-१ ते ३ ची दुरवस्था झाली होती. (Dhule 10 crore 77 lakh rupees sanctioned for Dhule ITI workshop)

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण एक हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकूण २० अभ्यासक्रम शिकविले जातात. अंतर्गत सुविधा नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत होती. कार्यशाळेतील छताचे पत्रे जीर्ण झाल्याने पावसाळ्यात त्यांना गळती लागत होती.

तसेच भिंतीचीही दुरुस्ती करणे आवश्यक होते. या कार्यशाळांची दुरुस्ती व्हावी म्हणून आमदार पाटील यांनी संबंधित विभागाला सूचना करून स्ट्रक्टरल ऑडिट करून घेतले. (Latest Marathi News)

त्यानंतर त्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्रालयाकडे यासाठी पाठपुरावा करून दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्तीसाठी एकूण दहा कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले.

या निधीतून तीन कार्यशाळांची दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, इलेक्ट्रिक कामे, स्वच्छतागृहाचे बांधकाम आदी कामे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT