धुळे : कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागामार्फत राज्यासह धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी संघ, खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. या योजनेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी १ हजार ६२१ गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना १९ लाख ६३ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली. (20 lakh subsidy to milk producers 1 lakh benefit to farmers in Nandurbar district )
डॉ. पाटील यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना दूध अनुदानाच्या लाभासाठी १२ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार जुलै २०२४ पासून पाच रुपये अनुदानाची योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी ७१२ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना योजनेपोटी चार लाख ३३ हजाराचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. नवीन योजना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू असल्याने लाभार्थी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर माहिती अपलोड करावी.
प्रति लिटरने वाढ
शासन निर्णय २६ सप्टेंबर २०२४ नुसार एक ऑक्टोबर २०२४ पासून शासनाने सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करून सात रुपये प्रति लिटर गायीच्या दुधासाठी अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. या अनुषंगाने ही योजना एक ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येणार असल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक दुग्ध संघ, संस्था व प्रकल्पांनी या अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे. (latest marathi news)
‘आयडी‘ रद्द करणार
यापूर्वी पाच जानेवारी २०२४ व १२ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये योजनेत सहभागी झालेल्या ज्या दुग्ध सहकारी संघ, संस्था व खासगी दुग्ध प्रकल्पांनी सहभाग नोंदविला आहे. परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेली नाही, अशा प्रकल्पांचे ‘आयडी‘ रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत एक जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीच्या दसवड्यांच्या शेतकऱ्यांच्या दुधासंबंधी माहिती अपलोड करावी. अन्यथा, लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल्यास संबंधित सहकारी संघ, संस्था व खासगी प्रकल्प जबाबदार राहील, असा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला.
शेतकऱ्यांना संपर्काचे आवाहन
एक ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेल्या प्रति लिटर सात रुपये अनुदान योजनेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच ई-मेल dddo.dhule@gmail.com किंवा ०२५६२-२३५९२४ / ८९९९३४०४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.