Dhule Kharif Season : धुळे तालुक्यात खरीप हंगामात एक लाख सात हजार ६५७ हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक असून धुळे जिल्ह्यासाठी महाबीज व खासगी क्षेत्रातील कंपनीकडून तीन लाख ७९ हजार ४६४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यंदा सर्वाधिक क्षेत्रात कापसाची लावची शक्यता असून, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही सुर्यफुलाची अत्यल्प लावणी होईल, असा अंदाज आहे. विहिरीत बऱ्यापैकी पाणी असलेल्या बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या लावणीला सुरवात केली आहे. (23 percent sowing of cotton for kharif season works in district )
आजपर्यंत २३ टक्के कापसाची लावणी झाली असून इतर धान्याची पेरणी झाली नाही. खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, नागली, भुईमूग, सोयाबीन, तीळ, तूर, मूग, उडीद, मका, कापूस आदी पिके घेतली जातात. कृषी विभागातर्फे बियाण्यांची मागणी केली असून, महाबीज व खासगी क्षेत्रातील कंपन्या बियाणांचा पुरवठा करणार आहेत.
त्यापैकी कापसासाठी दोन लाख १९ हजार ८८० पाकिटे बियाणे व उर्वरित धान्यासाठी एक लाख ५९ हजार ५८४ क्विंटल बियाणे मागविले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांत समाधान असून उत्साहाने बियाणे खरेदी केली जात आहेत.
खतांची उपलब्धता
कृषी विभागाने युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके आदी एक लाख ३३ हजार ६०० क्विंटल खते मागवली असून एक लाख पाच हजार ८०० क्विंटल खते आवंटन झाली आहेत. आतापर्यंत २० हजार ५६० खते विक्री झाली असून सध्या ७५ हजार ६९२ क्विंटल खतांचा साठा उपलब्ध आहे. दरवर्षाप्रमाणे तीळाच्या क्षेत्रात घट होत असून यंदा २०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून सूर्यफुलाची लावणी केवळ ४० हेक्टर आहे. (latest marathi news)
मागणी नसल्याने नागली पेरणीचे प्रमाणही यंदा कमी आहे. तालुक्यात यंदा १४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी व ३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. जिल्ह्यात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, मूग, भुईमूग आदी खरीपातील महत्त्वाची पिके असून मोठ्याप्रमाणात पेरणी अपेक्षित आहे.
पेरणी व बियाणांचे लक्ष्यांक (पिके, उद्दिष्ट क्षेत्र हेक्टरमध्ये व एकूण पेरणी)
१) कापूस - ७०,००० १६०३० २२.९०%
२) ज्वारी - ३,५०० - -
३) बाजरी - १३५०० - -
४) मका - १२५००
५) भुईमूग - २८००. - -
६) तीळ - २०० -
७) सोयाबीन ६५०
८) सुर्यफूल- ४०
९) तूर - १५००
१०) मूग - १५००
११) इतर - ४६७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.