veterinarians esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पशूवैद्यकांअभावी पशुधन अडचणीत; साक्री तालुक्यात विविध संवर्गाची 27 पदे रिक्तच

Dhule : साक्री तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एकचे सोळा व श्रेणी-दोनचेही सोळा दवाखाने असून एक पशुधन विस्तार अधिकारी व दहा पशुधन विकास अधिकारी आहेत.

दगाजी देवरे

Dhule News : साक्री तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एकचे सोळा व श्रेणी-दोनचेही सोळा दवाखाने असून एक पशुधन विस्तार अधिकारी व दहा पशुधन विकास अधिकारी आहेत. तालुक्यात सुमारे पाच लाख ९४ हजार ५९५ मुक्या जनावरांचे आरोग्य हे अकरा डॉक्टर आणि बारा पर्यवेक्षक कसे सांभाळत असतील, हाच खरा प्रश्न आहे. एकूण बत्तीस पशुवैद्यकीय केंद्रात पशुधन विकास अधिकारी सतरा, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चार, पशुधन पर्यवेक्षक वीस, व्रणोपचार तेरा तर परिचरची ३९ अशी ९३ पदे असताना पशुधन विकास अधिकारी सहा, पशुधन पर्यवेक्षक आठ, व्रणोपचार पाच, परिचर आठ अशी २७ पदे रिक्त आहेत. ( 27 posts of various cadres are vacant in Sakri taluka due to lack of veterinarians )

साक्री तालुक्यात श्रेणी-एकच्या सहा ठिकाणी पशुधन विकास अधिकारीपद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. दहिवेल, दहिवेल-फिरता दवाखाना, धाडणे, पिंपळनेर, वर्धाने, फोफरे या सहा ठिकाणी पशुधन विकास अधिकारीपद रिक्त असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या चार महिन्यांपूर्वी वर्धाने व फोफरे येथे पशुधन विकास अधिकारी हे पद भरले आहे. मात्र हे पशुधन विकास अधिकारी पुणे येथे (यशदा) प्रशिक्षणाला गेले आहेत.

पशुवैद्यकीय श्रेणी दोन पैकी ऐचाळे, इंदवे, कढरे, महिर, वाल्हवे, मालपूर व साक्री पंचायत समितीतील दोन अशी आठ पशुधन पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत. साक्री तालुक्याचा भूविस्तार मोठा आहे. निम्म्यापेक्षा जास्त भाग आदिवासीबहुल आहे. २०१७ च्या विसाव्या पशूगणनेनुसार तालुक्यातील पशुधनाची संख्या पाच लाख ९४ हजार ५९५ आहे. पाळीव जनावरांची संख्या पाहता आहेत ते डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक किती सेवा देतील हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे याच डॉक्टरांना कारकूनी करावी लागते ती वेगळीच.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना अनेक प्रकारचे आजार बळावू शकतात. अशावेळी शेतकरी, पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागतो. गेले वर्षभर मुक्या प्राण्यांना चारा, पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने काही ठिकाणी जनावरे सांभाळणे अवघड झाले होते. आजच्या स्थितीत ते चित्र पावसामुळे पालटणार आहे. (latest marathi news)

अहवालासाठी कसरत

म्हसदी ते सेदंवड मांजरीपर्यंत मोठे वनक्षेत्र आहे. सुरक्षित वनक्षेत्रामुळे या ठिकाणी वन्यपशूंचा वावर असतो. किंबहुना आठवडाभरातून एकतरी पाळीव प्राणी बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी जातो. वनविभागाकडून भरपाई मिळावी, यासाठी मृत जनावराच्या विच्छेदनाचा पशुधन विकास अधिकाऱ्याकडून तसा अहवाल सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी नाही, अशा ठिकाणच्या शेतकरी व पशूपालकांना अन्य ठिकाणी धावाधाव करावी लागते.

संबंधित पशुवैद्यकीय केंद्रात कायमस्वरूपी पशुवैद्यक नसल्याने शासनाला सेवा शुल्कातून महसूल मिळू शकत नाही. शिवाय पशुपालकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुठे इमारतीची अडचण तर कुठे वर्षानुवर्षे पदे रिक्त. एकेका डॉक्टराकडे अनेक पशुवैद्यकीय दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण आहे. पशुवैद्यकांअभावी दुभत्या जनावरांवर कृत्रिम रेतनासाठी अडचणी येतात.

दृष्टिक्षेपात पशुधन पाळीव जनावरांची संख्या

गायवर्ग : एक लाख वीस हजार ४८

म्हैसवर्ग : वीस हजार ६४५

शेळ्या : एक लाख २९ हजार २७२

मेंढ्या : तीन लाख २३ हजार ४४ ८

डुकरे : ११८२

''तालुक्यातील माळमाथा परिसरातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक-फोफरे, वर्धाने तसेच श्रेणी दवाखाना दोन- कढरे, इंदवे, महिर अशा पाच दवाखान्यांतील प्रमुख पदे रिक्त आहेत. परिसरात मेंढ्याची संख्या मोठी असल्याने पशुवैद्यकीय सेवा पुरविताना अडचणीचे ठरत आहे.''- डॉ.योगेश गावित, पशुधन विकास अधिकारी-विस्तार, पंचायत समिती, साक्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT