Snake Bite esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : पंधरा दिवसांत 3 जणांचा सर्पदंशाने मृत्यू! तळोदा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : तळोदा तालुक्यात सर्पदंशाच्या घटना घडत असून, गेल्या पंधरा दिवसांत तीन जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. (Nandurbar 3 people died of snakebite in fifteen days)

तळोदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात एकसारखा पाऊस सुरू होता. आता काहीशी पावसाने उघडीप दिली असली तरी परिसरात चांगलेच दमट वातावरण असल्याने सर्प आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात जमिनीखाली पाणी गेल्याने अन्नाच्या शोधात साप बाहेर पडत असल्याने सर्पदंशाने या पंधरा दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्पदंशाने मृत्यू होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी निसर्गप्रेमींकडून सर्पदंश, प्रथमोपचार, संदर्भसेवा याबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाळ्यात सापांचा प्रजनन काळ असतो. बिळामध्ये पाणी साचत असल्याने लपण्यासाठी जागेच्या शोधात असतात.

जून ते ऑगस्ट या कालावधीत साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांना साप दिसला तर घाबरून न जाता सर्पमित्रांना संपर्क करून सर्प पकडण्यास त्यांना बोलवावे, असे सांगण्यात येत असून, सध्या परिसरात नाग, मन्यार, घोणस, फुरसे हे विषारी साप आढळून येत आहेत. त्यांचा दंश प्राणघातक राहत असल्याने पावसाळ्यात खबरदारीचा उपाययोजना म्हणून व्यापक जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. (latest marathi news)

ही घ्या दक्षता

तळोदा तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंशाच्या लशीचा मुबलक साठा उपलब्ध करावा. तसेच रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याविषयी सक्ती करावी, अशी मागणीही होत आहे. दरम्यान, साप हा निशाचर असल्याने त्याचा वावर रात्री जास्त असतो.

त्यामुळे जमिनीवर झोपताना अंथरूण भिंतीलगत टाकू नये तसेच झोपताना मच्छरदाणीचाचा वापर करावा, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्यांच्या घरातील खिडकी, दरवाजा यांना लागून असलेल्या झाडांच्या फांद्या, वेलीही तोडाव्यात, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

सर्पदंश झाल्यास हे करावे

सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या स्वच्छ जागी हलवून त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. त्याला कोणतेही श्रम करू न देता त्यास शांत पडून राहण्यास सांगावे. किमान हालचाल करू द्यावी, जेणेकरून विष शरीरभर पसरणार नाही. दंश झालेला शरीराचा भाग हृदयापेक्षा कमी उंचीवर शक्यतो ठेवावा, त्यामुळे विष शरीरभर जाण्याची प्रक्रिया मंद होईल. दंश झालेल्या ठिकाणच्या थोड्या वरच्या बाजूस एक आवळपट्टी घट्ट बांधून तत्काळ सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात हलवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT