Majhi Ladki Bahin Yojana form status online esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात 9 लाख `लाडक्या बहिणी`; 30 हजार महिला आधारकार्ड `लिंकिंग`अभावी वंचित

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून सुमारे नऊ लाख १९ हजार ८६९ महिलांनी अर्ज केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून सुमारे नऊ लाख १९ हजार ८६९ महिलांनी अर्ज केले. पैकी ३० हजार ५२८ महिलांनी आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न न केल्याने त्यांना प्रतिमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळाला नाही. अशा महिलांच्या घरोघरी भेटी देत आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना सूचना दिली आहे. ( 30 thousand women deprived due to lack of Aadhaar card linking for ladki bahin yojana )

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार आणि दीड हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यात अद्याप लाभ रक्कम जमा झालेली नाही. परंतु, ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत, त्यांच्या बँक खात्यात काही दिवसांमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत. कारण सरकारने चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचा निर्णय

योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्यात साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, आता ऑक्टोबरमध्ये याच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा होणार आहे. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता मिळून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणूक येऊ घातली असतानाच महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरची लाभ रक्कम ऑक्टोबरमध्ये बँक खात्यात वर्ग केली जाईल. दिवाळीच्या मुहूर्तावर भाऊबीजेच्या ओवाळणीची लाभ रक्कम महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (latest marathi news)

बँकेत महिलांची गर्दी

बँक खात्यात पैसे जमा झाले अथवा नाही हे तपासणीसाठी, ते काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी होताना दिसते. त्याचा बँक व्यवस्थापनावर ताण पडत आहे. काही महिलांकडून `केवायसी`ची प्रक्रिया होत नसताना त्याही बँक खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. अनेक महिला पासबुक `अपडेट` करण्यासाठी रांगा लावत आहेत. गर्दीला आवरताना बँक व्यवस्थापनाला नाकी नऊ येत आहे. बहुसंख्य महिलांनी त्यांच्या खात्यात आलेले पैसे पहिल्याच दिवशी काढून घेतले.

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभाची सद्यःस्थिती स्थिती

* जिल्हा........अर्ज.................मंजूर अर्ज.........आधार असंलग्न

* धुळे...........५,००,७८३........४,८२,५१०........१८,२७३

* नंदुरबार.......४,१९,०८६........४,०६,८३१........१२,२५५

* जळगाव......९,९४,७७३........९,६३,८६१.........३०,९१२

* नाशिक.......१४,८६,४१३......१४,३५,६६७........५०,७४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT