Both the rear wheels of the accident Sakri-Malegaon bus have come off, the disrepair of the bus, while the passengers are undergoing treatment at the rural hospital. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : साक्री-मालेगाव बसचा अपघात; 40 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : येथील एसटी आगाराच्या साक्री-मालेगाव बसचा दुपारी तीनच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजिक अपघात होऊन यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारांसाठी धुळे येथे रवाना करण्यात आले असून, अन्य ३७ रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील आगाराची साक्री-मालेगाव बस (एमएच ४०, एन ९०७५) दुपारी अडीचला आगारातून निघाल्यानंतर तीनच्या सुमारास दातर्ती गावाच्या अलीकडेच अपघातग्रस्त झाली. (40 injured in Sakri Malegaon bus accident )

यातील प्रवाशांच्या सांगण्यानुसार दातर्ती गावाजवळ पांझरा नदीच्या पुलाच्या अलीकडेच वळणाजवळ बस जोरात उधळल्यानंतर मागील दोन्ही चाके निघाली आणि अपघात झाला. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून साक्री ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यात बसमधील सर्व ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यातील तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ धुळे येथे रवाना करण्यात आले.

अन्य जखमी रुग्णांवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांमध्ये धमनार, म्हसदी, ककानी, किरवाडे येथील प्रवाशांचा समावेश आहे. साक्री आगाराचे वाहतूक अधीक्षक कुणाल घडमोडे, वाहतूक निरीक्षक यशोवर्धन नगराळे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत एसटी आगारातर्फे रुग्णांना तत्काळ मदत केली.

एकाच दिवशी तीन अपघात..!

दरम्यान, आजच्या दिवशी साक्री आगाराच्या तीन बस अपघातग्रस्त झाल्या. सकाळी सव्वासातच्या सुमारास साक्री आगारातून सुटणाऱ्या अहवा-धुळे बसला गुजरातमधील सुबीर येथील चेक पोस्टनजीक अपघात झाला, तर सकाळी नऊच्या सुमारास साक्री-पुणे बसचा नामपूर गावानजीक अपघात झाला, तर दुपारी तीनच्या सुमारास साक्री-मालेगाव बसचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी साक्री-नाशिक या बसचादेखील अपघात झाला होता.

काही वेळा अपघात चालकांच्या चुकांमुळे अथवा अन्य कारणांमुळे होत असले तरी सध्या एसटी बसच्या सुरक्षिततेतील तांत्रिक अडचणींमुळेदेखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत एसटी बसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने तांत्रिक अडचणीमुळेदेखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बस ‘पूर्णपणे तंदुरुस्त’ नसताना त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून, या सर्व गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT