Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in the Administrative Standing Committee meeting in Municipal Hall esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दसेरा मैदानाला 45 कोटींचे व्यापारी संकुल; प्रशासकीय स्थायी सभेत मंजुरी

Dhule : शहरातील दसेरा मैदान येथील मंजूर फायनल प्लॉट नंबर १५३ येथे तब्बल ४४ कोटी ८७ लाख रुपये खर्चातून व्यापारी संकुल बांधण्यास प्रशासकीय स्थायी समितीने बुधवारी (ता. ६) मंजुरी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील दसेरा मैदान येथील मंजूर फायनल प्लॉट नंबर १५३ येथे तब्बल ४४ कोटी ८७ लाख रुपये खर्चातून व्यापारी संकुल बांधण्यास प्रशासकीय स्थायी समितीने बुधवारी (ता. ६) मंजुरी दिली. याशिवाय प्रशासकीय महासभेत घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभारणीसह मंजुरी देण्यात आली. (Dhule 45 crore commercial complex for Dussehra Maidan approved in administrative standing meeting)

याशिवाय अल्पसंख्याक क्षेत्र विकास, मूलभूत सोयी-सुविधांचा विकास, मनपा क्षेत्रातील पथदीपांची दैनंदिन निगा व दुरुस्ती आदी विविध कामांनाही मंजुरी मिळाली. महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर विविध योजनांतील कामांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लावण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे, धोरणात्मक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

यासाठी प्रशासकीय स्थायी समिती, प्रशासकीय महासभांचाही सपाटा सुरू आहे. बुधवारी (ता. ६)देखील प्रशासकीय महासभा तसेच दोन प्रशासकीय स्थायी समिती सभा घेण्यात आल्या. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

दसेरा मैदान व्यापारी संकुल

प्रशासकीय स्थायी समिती सभा-९ मध्ये धुळे मनपा मंजूर फायनल प्लॉट नंबर १५३ येथे व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्राप्त निविदांवर निर्णयाचा विषय होता. या व्यापारी संकुलासाठी महासभेने ४४ कोटी ८७ लाख ७७ हजार ३५४ रुपये खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती.

त्याला शहर अभियंत्यांकडूनही तांत्रिक मंजुरी मिळाली. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्या. या प्रक्रियेत मे. गायत्री कन्स्ट्रक्शन धुळे (अंदाजपत्रकीय दर), मे. एस. बी. देशमुख (पाच टक्के जास्त), मे. विकास जे. व्ही. (दोन टक्के जास्त) अशा तीन निविदा प्राप्त झाल्या. यातील अंदाजपत्रकीय दराची मे. गायत्री कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली.

कचऱ्यासाठी प्रकल्प

दरम्यान, त्यापूर्वी झालेल्या प्रशासकीय महासभेत मनपा कार्यक्षेत्रातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प उभारण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली. या कामासाठी इंदाई रिसायकलर्स या कंपनीला महापालिका सुमारे एक एकर जागा उपलब्ध करून देणार आहे.

संबंधित कंपनी सीएसआर फंडातून हा प्रकल्प उभारणार आहे. कार्यादेश दिल्यानंतर तीन महिन्यांत प्रकल्प उभारणे व पुढील तीन महिने कंपनीने तो प्रकल्प स्वखर्चाने चालवायचा आहे. या प्रकल्पासाठी इतरही विविध अटी-शर्ती आहेत. असा प्रकल्प उभारणीस महासभेने मंजुरी दिली.

दोनशे कोटींची कामे मंजूर

दरम्यान, महापालिकेत नवीन वर्षापासून अर्थात जानेवारी २०२४ पासून प्रशासकराज सुरू झाले. या काळात आतापर्यंत नऊ प्रशासकीय स्थायी समिती सभा झाल्या, तर चार प्रशासकीय महासभादेखील झाल्या. यात महापालिकेचे एक हजार ७२८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकदेखील मंजूर झाले आहे.

दरम्यान, या प्रशासक कार्यकाळात आतापर्यंत सुमारे २०० कोटींवर खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व कामांचे कार्यादेश काढणे व कामे प्रत्यक्षात सुरू होण्याच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच कंट्रोलिंग ऑफिसर नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT